घरदेश-विदेशअबब! बकरीच्या मृत्युमुळे सरकारचे २.६८ कोटींचे नुकसान

अबब! बकरीच्या मृत्युमुळे सरकारचे २.६८ कोटींचे नुकसान

Subscribe

ओडिशामध्ये तालचेर कोल्डफिल्डस क्षेत्रात एका बकरीच्या मृत्यूनंतर झालेल्या आंदोलनामुळे सरकारच्या २.६८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी तालचेर कोल्डफिल्डसमध्ये जगन्नाथ सिडिंग्स येथे कोळसा ने-आण रोखल्यामुळे आणि डिस्पॅच कामात व्यत्यय आणल्यामुळे कंपनीला हे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सोमवारी कोळशाच्या गाडीची धडक लागल्यामुळे एक बकरीचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक लोक भडकले. त्यांनी बकरीच्या मृत्यू झाल्यामुळे ६० हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी चटिया हर्टिंग्स गावातील काही लोकांनी हंगामा केला. त्यानंतर त्या लोकांनी कोळशाची ने-आण करण्याचे काम तातडीने थांबवले. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दुपारी २.३० वाजता हे काम पुन्हा सुरू झाले.

एमसीएलच्या प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे की, साडेतीन तासांपेक्षा जास्त काळ काम रोखल्यामुळे कंपनीला १.४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर रेल्वेच्या माध्यमातून डिस्पॅचच्या कामात १.२८ कोटी रुपयांचे नुकसान झाले.

- Advertisement -

हेही वाचा –

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा शिवसेनेत प्रवेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -