घरदेश-विदेशरोड रोलरवर बसून काढली वरात

रोड रोलरवर बसून काढली वरात

Subscribe

आपले लग्न वेगळ्या प्रकारे करण्यासाठी एका नवरेदेवाने रोड रोलरवरून वरात काढल्याचा प्रकार पश्चिम बंगालमध्ये उघडकीस आली आहे.

जीवनात एकदाच होणाऱ्या लग्नाच्या आठवणी जीवनभर टीकाव्यात म्हणून अनेकजण प्रयत्न करतात. यासाठी लग्नामध्ये वेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. आहेर देण्याची पद्धत किंवा पाहूण्यांचे स्वागत करण्याची रित यामध्ये नेहेमीच काही तर वेगळे करण्याचा प्रयत्न केला जातो. असाच एक प्रयत्न पश्चिम बंगालमध्ये केला गेला आहे. पश्चिम बंगालचा नाडिया जिल्ह्यातील एका तरुणाने आपली वरात रोड रोलरवर बसून काढली. आतापर्यंत गाडी आणि घोड्यावर काढल्या जाणाऱ्या वरातीत रोड रोलर कधीही वापरला गेला नाही. लोकांनाही हे बघून आश्चर्य वाटले. अर्का पेट्रा (३०) असे या तरुणाचे नाव आहे. उकीपारा येथील कृष्णानगर परिसरात त्याच्या पत्नीचे घर आहे. लग्नाला रोड रोलरवर येतांना बघून नवरीच्या घरच्यांनाही आश्चर्य वाटले. या वरातीत नवऱ्याचे कुटुंबीय आणि मित्र हे एका मिनीबसमधून आले होते.

“मला माझा लग्न समारंभ स्मरणीय आणि युनिक पद्धतीने करायचा होता. एक व्हिंटेज गाडी वरून वरात काढण्याचा निर्णय मी अगोदर केला होता, मात्र यापूर्वी ही पद्धत वापरल्या गेली होती. रोड रोलरवरून कधीही कोणी लग्नासाठी गेले नव्हते म्हणून मी माझी वरात रोड रोलर वरून काढायचे ठरवले. लग्न सोहोळ्यात स्पीकरवाजवण्यात आले नाही. फक्त एक बासूरी वाजवण्यात आली होती.” – अर्का पेट्रा, नवरदेव

- Advertisement -

सहा किलोमाीटर चालून 

यापूर्वीही एका नवरदेवाने लग्न करण्यासाठी सहा किलोमीटर बर्षावर चालत वरात काढली होती. उत्तराखंड येथे हवामान थंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हिमवर्षा झाली होती. अखेर बर्फातून वाट काढत तो पत्नीच्या घरी पोहोचला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -