घरदेश-विदेशभारत-पाक सागरी सीमेवर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; गुजरात पोलिसांकडून 667 माफियांना अटक

भारत-पाक सागरी सीमेवर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; गुजरात पोलिसांकडून 667 माफियांना अटक

Subscribe

गुजरात पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटविरोधात मोठे ऑपरेशन सुरु केले आहे. यावेळी भारत पाक यांच्यातील सागरी सीमा रेषेवर तटरक्षक दलासह गुजरात एटीएसने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. गुजरात पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात एनजीपीएस अॅक्ट अंतर्गत 422 गुन्हे दाखल केले. या प्रकरणी आत्तापर्यंत 667 ड्रग्ज माफियांना अटक केली आहे.

यादरम्यान 25 हजार 699 किलोचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 5 हजार कोटी रुपये इतके आहे. गुजरात पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात दहा मोठ्या कारवाया केल्या आहेत.  भारताचे शत्रु राष्ट्र समुद्रामार्गे ड्रग्ज भारतात पाठवत होते. यावेळी समुद्राच्या आत ड्रग्ज माफियांना रंगेहात पकडण्यात आले, यावेळी समुद्राच्या आत अनेकदा गोळीबाराच्या घटना देखील घडल्या. दरम्यान कराचीतील सर्वात मोठा ड्रग्ज माफियाच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ड्रग्जच्या माध्यमातून भारतातील युवा पिढीला खराब करण्याचा पाकिस्तानचा प्लॅन असल्याचे म्हटले जातेय. यापूर्वी ड्रग्ज माफिया पंजाब आणि दक्षिण भारतातून ड्रग्ज पाठवत होते. यानंतर आत गुजरात मार्गे ड्रग्ज पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

ड्रग्ज माफिया अतिशय चलाखीने भारतात ड्र्ग्जचा साठा पाठवत होते. कपड्याच्या व्यवसायाच्या नावाखाली हे माफिया शर्टच्या कॉलर, बाह्यांची शिलाई यामधून ड्रग्ज पाठवत होते. गुजरात पोलिसांनी ड्रग्ज साठ्यासह ड्रग्ज पुरवठादारांचे रॅकेटही उद्धवस्त केले आहे. यासंदर्भातील एक कॉल रेकॉर्डिंग आता व्हायरल होत आहे. या रेकॉर्डिंगमध्ये एक ड्रग्ज माफिया दुसऱ्या ड्रग्ज माफियाला म्हत आहे की, गुजरात सीमेवरून भारतात ड्रग्ज आणणे कठीण आहे. गुजरातच्या एटीएस पथकाकडून धडक कारवाई सुरु असून ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडले आगे. त्यामुळे ड्रग्ज माफियांना आता ड्रग्ज पुरवठा करण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागतोय.


मध्यप्रदेशच्या जबलपुरमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग, आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -