घरक्रीडाभारत वि. वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याच्या वेळेत बदल

भारत वि. वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याच्या वेळेत बदल

Subscribe

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-२० सामन्याच्या वेळेच बदल करण्यात आला आहे. आता रात्री आठ वाजल्यापासून सामना सुरू होणार नाही.

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-२० सामन्याच्या वेळेच बदल करण्यात आला आहे. आता रात्री आठ वाजल्यापासून सामना सुरू होणार नाही. आधीच्या वेळापत्रकानुसार, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-२० सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार होता. वेस्ट इंडीजच्या सेंट किट्समध्ये खेळवला जाणार होता. मात्र आता हा सामना रात्री १० वाजता सुरू होणार आहे. (India vs west indies 2nd t20 match to start at 10 pm)

वनडे मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-२० मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या टी-२० सामन्याच्या वेळेत बदल केला आहे.

- Advertisement -

नव्या वेळापत्रकानुसार, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याची नाणेफेक रात्री १० वाजता होणार आहे. त्यानंतर रात्री १०:३० वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. दरम्यान, या पाच टी-२० मालिकेतील पहिला समाना भारताने जिंकला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजचा पराभव करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नव्या वेळापत्रकाबाबत क्रिकेट वेस्ट इंडीजने दिलेल्या माहितीनुसार, “CWI च्या नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीमुळे त्रिनिदाद येथून सेंट किट्सला संघाचे महत्वपूर्ण सामान पोहोचण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे आजचा सामना दुपारी १२:३० वाजता खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीय वेळेनुसार हा सामना १० वाजता सुरू होईल.

- Advertisement -

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील वनडे मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता खेळवण्यात आले. त्याचवेळी टी-२० मालिकेतील सामन्यांची वेळ रात्री ८ वाजल्यापासून ठेवण्यात आली होती. रात्री आठ वाजल्यापासून उभय संघांमधला पहिला टी-२० सामना खेळवण्यात आला, मात्र आता अचानक दुसऱ्या टी-२०च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.


हेही वाचा – भारतीय बॉक्सर अमित पंघालचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; वनुआटूच्या नामारी बेरी पराभूत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -