घरदेश-विदेशमध्यप्रदेशच्या जबलपुरमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग, आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशच्या जबलपुरमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग, आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू

Subscribe

मध्यप्रदेशच्या जबलपुरमध्ये एका खासगी रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहे. जबलपूरमधील दमोह नाका शिवनगर स्थित न्यू लाईफ मल्टीस्पेशलिटी रुग्णालयाला ही आग लागली आहे. आगीतील मृतांमध्ये सर्वाधिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र रुग्णालयाचे या आगीत सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे.

- Advertisement -

जबलपूरचे मुख्य पोलीस अधिकारी अखिलेश गौर म्हणाले की, या रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग ग्राऊंड फ्लोरपासून ते थर्ड फ्लोरपर्यंत पसरली होती.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी घटनेवर ट्विट करत म्हटले की, या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 – 5 लाखांची आर्थिक मदत दिली जाईल, तर दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 – 50 हजारांची आर्थिक मदत दिली जाईल, तसेच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकार करेल.

- Advertisement -

दरम्यान या रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी एकमेव रस्ता असल्याने घटनेवेळी बहुतांश लोक आत अडकून राहिल्याची माहिती आहे. त्यामुळे आगीने गंभीर रुप धारण केले आणि सर्वाधिक लोक या आगीच्या भक्षस्थानी आले.  आगीची भीषणता इतकी होती की, अग्निशमन दलाच्या गाड्यांना या आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही, त्यानंतर वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन कापले. यानंतर तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.

 

 


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -