घरदेश-विदेशMango Export : दोन वर्षांच्या कोरोना ब्रेकनंतर फळांचा राजा निघाला अमेरिका दौऱ्यावर

Mango Export : दोन वर्षांच्या कोरोना ब्रेकनंतर फळांचा राजा निघाला अमेरिका दौऱ्यावर

Subscribe

फळांचा राजा अशी ओळख असणारा आंबा (Mango) यंदा मुंबईच्या (Mumbai) बाजारपेठेत गतमहिन्यातच दाखल झाला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत हापूसचा निर्यातीचा (Export) मार्ग देखील आता मोकळा झाला आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षापासून परदेशी खवय्ये गोड रसाळ आंब्याच्या चवीपासून वचिंत राहीले आहेत. आणि अखेर दोन वर्षानंतर आता फळांचा राजा हा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. निर्याती संबंधीच्या सर्व अडचणी दूर झाल्या असून अमेरिकेतील ग्रहकांना दोन वर्षानंतर हापूसची चव चाखता येणार आहे.

ज्या प्रमाणे प्रत्येक हापूस प्रेमी आंब्याच्या सिझनची वाट पाहत असतो त्या प्रमाणे मुक्त बाजारपेठेतील ग्रहक देखील हापूसची चव चाखण्यासाठी वाट पाहत असतात. अशीच काहीशी परिस्थिती अमेरिकेतील खाद्यप्रेमींचीही असते. पण गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्यात ही रोखण्यात आली होती. अखेर अमेरिकेतील कृषी विभागाने आता आयात करण्यास परवानगी दिल्याने हापूस आंब्याचा निर्यातीचा मार्ग खुला झाल असल्याचे आंबा बागायत संघाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

- Advertisement -

आंबा निर्यातीचा फायदा

भारतातील मुख्य बाजारपेठांमध्ये ज्या प्रमाणे आंब्याला मागणी असते त्याप्रमाणे अमेरिकेतील आंबा प्रेमी देखील हापूस आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र देशभरात लागू करण्यात आलेल्या कठोर नियम व निर्बंधामूळे निर्यात बंदी करण्यात आली होती. अखेर केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप केल्याने निर्यातीचा मार्ग हा मोकळा झालाय. कोरोनामुळे तसचे निसर्गाच्या चक्रामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान झाले. मात्र यातील काहीशी दिलासादायक बाब म्हणजे आता बाजारपेठेतील दर आणि निर्यातील मिळालेली परवानगी यामुळे परकीय चलनाचा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान बाजरपठेतील वाढत्या मागणीमुळे उत्पादनात घट झाली असली तरी उत्पन्न वाढवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे…

कोरोनामुळे निर्यातीवर निर्बंध

दरवर्षी देशातून तब्बल 1 हजार टन आंबा हा अमेरिकेत निर्यात होत असतो. यामध्ये 300 टन तर हापूस आंबाच असतो. मात्र कोरोनामुळे संपूर्ण जगभरात निर्माण झालेल्या परस्थितीमुळे राज्यासह, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, या भागातील आंबा निर्यात ही बंद होती. दरम्यान अमेरिकेतील कृषी विभागातील निरिक्षकांना या आंब्यावरील विलिगीकरण सुविधांची तपासणी करणे शक्य नसल्याने हे निर्बंध लादण्यात आले होते. आगामी मार्च महिन्यापासून प्रत्यक्ष निर्यातीला सुरुवात होणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहे.

- Advertisement -
आंबा निर्यातीचा प्रश्न सुटला –

आंबा निर्यातीसाठी अमेरिकेच्या कृषी विभागाची परवानगी गरजेची असते मात्र कोरोनामुळे याची परवानगी नाकारण्यात आली होती. 2021 नोव्हेंबर पासून भारत- अमेरिका व्यापार मंचाची बैठक पार पडली यामध्ये दोन्ही देशातील शेतमालाच्या निर्यात – आयात संदर्भातील धोरण ठरवण्यात येते. करारानुसार आता देशातून आंबा , डाळिंब याची देखील निर्यात होणार आहे. याचा सर्वाधिक नफा हा महाराष्ट्रालाच होणार आहे यातील महत्वपूर्ण कारण म्हणजे हापूसची सर्वाधिक निर्यात ही महाराष्ट्रातूनच होते


हे हि वाचा – Republic Day 2022 : दरवर्षी 23 जानेवारीपासून साजरा होणार प्रजासत्ताक दिन ; वाचा काय आहे कारण

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -