घरदेश-विदेश"राहुल गांधी म्हणजे निपाह व्हायरस"

“राहुल गांधी म्हणजे निपाह व्हायरस”

Subscribe

“राहुल गांधी म्हणजे ‘निपाह व्हायरस’ आहेत. त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक राजकीय पक्ष संपणार.” असे, वादग्रस्त वक्तव्य हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी केले आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. यापूर्वी देखील अनिल वीज यांनी अशाच प्रकारचे वादग्रस्त विधाने करून वाद ओढवून घेतलेला आहे.

- Advertisement -

अनिल वीज आणि वादग्रस्त विधाने

“लाला लजपतराय आणि भगतसिंग यांनी देशासाठी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधींपेक्षा सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची तुलनाच होऊ शकत नाही”, असे वक्तव्य करुन वीज यांनी मोठा वाद निर्माण केला होता. शिवाय, “राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनणे म्हणजे मोदींच्या काँग्रेस मुक्त भारतला मदत करण्यासारखे” असल्याचे देखील वीज यांनी म्हटले होते. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांची तुलना ही राहुल गांधींच्या कुत्र्याशी केल्याने देखील वीज वादात सापडले होते.

- Advertisement -

काय आहे निपाह व्हायरस?

केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. शिवाय एका नर्सने देखील आपला जीव गमावला आहे. वटवाघळापासून निपाह व्हायरस पसरतो. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण आहे. वटवाघळांनी खाल्लेल्या फळांमार्फत निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव होतो. निपाह व्हायरस जास्त प्रमाणात पसरू नये म्हणून काही फळे खाण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -