घरदेश-विदेशHayabusa मोटारसायकलचे न्यू मॉडेल लॉंच

Hayabusa मोटारसायकलचे न्यू मॉडेल लॉंच

Subscribe

सुझिकी मोटारसायकल इंडिया लिमिटेडने हायाबुसा या सर्वाधिक पसंतीस उतरलेली ही स्पोर्टस मोटारासायकलचे नुकतेच भारतात लॉंचिंग झाले आहे.

सुझिकी मोटारसायकल इंडिया लिमिटेडने आपली लोकप्रिय स्पोर्ट्स मोटारसायकल Hayabusa चे नवीन मॉडेल गुरुवारी भारतीय बाजारात लॉंच करण्यात आले आहे. २०१९ Suzuki Hayabusa ची दिल्लीत एक्स शोरुम किंमत १३ लाख ७४ हजार रुपये ठेवण्यात आली असून या मोटारसायकलची ऑन रेड किंमत १४ लाख रुपयांहून अधिक असण्याची शक्यता आहे. या कंपनीने नवीन दोन रंगांच्या मोटारसायकल आणल्या आहेत. ज्यात मेटेलिक ऊर्ट ग्रे आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक रंग असणार आहे.

सर्वाधिक पसंत असलेली मोटरसायकल

गेल्या २० वर्षांपासून सुझुकी हायाबुसा सर्वाधिक पसंतीस उतरलेली स्पोर्टस मोटारासायकलपैकी एक आहे. या मोटारसायकलचे नुकतेच लॉंचिंग झाले असून या मोटारसायकलाही भारतात मोठी पसंती आहे. या नव्या सुझुकी हायाबुसामध्ये ग्राफिक्स आणि दोन साईड रिफ्लेक्टर्स देण्यात आले. यात १३४०, सीसी, इन लाइन, ४ सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. तर हे इंजिन ९ हजार ५०० आरपीएम १९ बीएचपीची ऊर्जा आणि ७ हजार २०० आरपीएमवर १५५ एनएम पीक टॉर्क निर्माण करते.

- Advertisement -

वेगवान मोटारसायकल

सुझुकी हायाबुसाचा वेग असून ही मोटारसायकल अवघ्या २.४७ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. या मोटरसायकलचा सर्वाधिक वेग म्हणजे २९९ किमी प्रतितास असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -