घरअर्थजगतHDFC बँकेने दिला ग्राहकांना मोठा धक्का, एफडी संदर्भात घेतला मोठा निर्णय

HDFC बँकेने दिला ग्राहकांना मोठा धक्का, एफडी संदर्भात घेतला मोठा निर्णय

Subscribe

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट असलेल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने मुदत ठेवींचे (FD) व्याज दर कमी केले आहेत. बँकेने सर्व प्रकारच्या मुदत ठेवींवरील व्याज दरात बदल केला आहे. HDFC बँकेत सात दिवस ते २९ दिवसांच्या मुदत ठेवींवर २.५० टक्के व्याज मिळेल. बँकेतील ही सर्वात कमी एफडी आहे. या बँकेत जास्तीत जास्त १० वर्षे मुदत ठेव (FD) ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे. नवीन व्याजदर २५ ऑगस्टपासून लागू झाले आहेत.

या बदलानंतर आता ३० ते ९० दिवसात मॅच्युअर एफडीवर ३ टक्के वार्षिक व्याज दिले जाईल. त्याचबरोबर ९१ दिवस ते ६ महिन्यांच्या एफडीला आता ३.५ टक्के व्याज मिळेल, तर पूर्वी ४ टक्के व्याज मिळत होते. याशिवाय ९ महिन्यांपासून ते एका वर्षाच्या मुदत ठेवींवर ४.५ टक्के ऐवजी आता ४.४ टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर २ वर्ष ते ३ वर्षांच्या कालावधीत मॅच्युअर एफडीवर आता वार्षिक व्याज ५.१५ टक्के मिळेल. आता एचडीएफसी बँकेत ३ ते ५ वर्षांच्या मुदत ठेवींवर ५.३० टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर ५ ते १० वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या ठेवींवर ५.५० टक्के दराने व्याज मिळेल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -