घरदेश-विदेशचांद्रयान २ : आज चांद्रयानापासून लँडर विक्रम होणार वेगळा

चांद्रयान २ : आज चांद्रयानापासून लँडर विक्रम होणार वेगळा

Subscribe

इस्रोचे चांद्रयान-२ हे आज महत्त्वाचा टप्पा पार करणार असून आज चांद्रयानापासून लँडर विक्रम वेगळा होणार आहे.

‘चांद्रयान-२’ची पाचवी आणि अखेरची कक्षा सुधारणा करून यानाला चंद्राभोवती ११९ बाय १२७ किलोमीटरच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) रविवारी यश आले. रविवारी संध्याकाळी सहा वाजून २१ मिनिटांनी यानाचे इंजिन ५२ सेकंदांसाठी प्रज्वलित करून ही सुधारणा करण्यात आली असून त्यानंतर इस्रोचे चांद्रयान-२ हे आज महत्त्वाचा टप्पा पार करणार आहे. सोमवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे ते १ वाजून ४५ मिनिटे या कालावधीत विक्रम लँडर आणि प्रग्यान रेव्हर मुख्य यानापासून वेगळे केले जाणार आहे.

विक्रम लँडरला चंद्राच्या जमिनीवर उतरवण्याचा घटनाक्रम

या मोहिमेतील दोन महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. २ सप्टेंबर रोजी चांद्रयानापासून लँडर विक्रम वेगळा होईल. त्यानंतर ३ सप्टेंबरला विक्रम लँडरची चंद्राभोवतीची कक्षा १०९ बाय १२० किलोमीटर करण्यात येईल. त्यानंतर ४ सप्टेंबरला ती आणखी कमी करून ३६ बाय ११० किलोमीटर करण्यात येईल. दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी पहाटे ०१:३० ते ०२:३० दरम्यान लँडर आणि रोव्हरला चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी दिली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यावेळी इस्त्रोमध्ये उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान ७ सप्टेंबरला राहणार इस्त्रोत उपस्थित; चांद्रयान २ चंद्रावर लँडींग करणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -