घरदेश-विदेशHand Sanitizer चा अतिवापर हानिकारक! - केंद्र सरकारने दिला इशारा

Hand Sanitizer चा अतिवापर हानिकारक! – केंद्र सरकारने दिला इशारा

Subscribe

केंद्र सरकारने कोरोनापासून बचाव करण्यासाठी हँड सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे त्याच्या अधिक वापराने होणाऱ्या दुष्परिणामांबाबतही नागरिकांना सावध केलं आहे.

जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना त्याच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं आणि हँड सॅनिटायझरने सतत हाथ स्वच्छ करणे असं वारंवार सांगितले जात आहे. मात्र वारंवार हँड सॅनिटायझर वापरल्याने त्वचेला नुकसान होऊ शकतं, त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात असे याआधीही अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. आता केंद्र सरकारनेही नागरिकांना याबाबत सावधतेचा इशारा दिला आहे.

हँड सॅनिटायझरचा अतिवापर हानिकारक ठरू शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (central health ministry) सांगितले आहे. तर सॅनिटायझरचा सतत वापर न करता साबणाचा वापर करावा, असा सल्लाही आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

- Advertisement -

कोरोनाचा व्हायरसचा उद्रेक होऊन देशात अशी वेळ येईल असेल कोणालाही वाटले नव्हते. स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करा. गरम पाणी प्या आणि हात नीट धुवा, सॅनिटायझरचा अति वापर करू नका, असे आरोग्य विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. आर. के वर्मा यांनी सांगितले व नागरिकांना इशारा देत सावध देखील केले आहे.

- Advertisement -

दरम्यान काही तज्ज्ञांनी असा सल्ला दिला होता की, सॅनिटाझरचा जास्त वापर केल्याने त्वचेवरील चांगल्या बॅक्टेरियांचाही नाश होऊ शकतो. साबण आणि पाणी असेल तर त्यानेच हात धुवा. साबण नसेल तेव्हाच सॅनिटायझरचा वापर करा असे वारंवार सांगण्यात येत होते.


Video_ जाणून घ्या, सॅनिटायझरचा शरीरावर कोणता दुष्परिणाम होतो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -