घरताज्या घडामोडीड्युटीवर नसतानाही कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

ड्युटीवर नसतानाही कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

Subscribe

ड्युटीवर नसतानाही कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दक्षिण-पश्चिम दिल्लीतील राजोकरी उड्डाण पुलाजवळील एका सर्व्हिस लेनवर शनिवारी रात्री एक भीषण आणि हृदयद्रावक अशी घटना घडली आहे. यामध्ये ड्युटीवर नसतानाही कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिल्ली वाहतूक पोलीस विभागातील एका ५४ वर्षीय कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्ताचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे ते ड्युटीवर नसतानाही केवळ रस्त्याव झालेली वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आपले कर्तव्य बजावत होते.

नेमके काय घडले?

राजोकरी उड्डाणपुलाजवळील एका सर्व्हिस लेनवर भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांना अक्षरशा ५० फूट लांब फरफटत नेले. हा भीषण अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातानंतर गंभीर जखमी झाल्यानंर बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला तशाच परिस्थितीत सोडून ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, घटनास्थळी अत्यंत गंभीर जखमी अवस्थेतील एसीपी संकेत कौशीक यांना एआयआयएमस ट्रामा सेंटर येथे नेण्यात आले. मात्र, त्यांना त्या ठिकाणी मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त देवेंद्र आर्य यांनी दिली आहे.

- Advertisement -

पोलीस उपायुक्त देवेंद्र आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार; कौशीक यांची द्वारका ट्राफिक सर्कल येथे नियुक्ती करण्यात आली होती. ते ड्यूटीवरून आपल्या सरकारी वाहनाद्वारे चालक आणि ऑपरेटरबरोबर परतत होते. दरम्यान, राजोकरी उड्डाणपुलाजवळील एका सर्व्हिस रोडवर त्यांना वाहतूकीची कोंडी झाली असल्याचे निदर्शनास आले. यामुळे एसीपी कौशीक आपल्या सहकाऱ्यांबरोबर वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी वाहनातून खाली उतरले आणि त्या ठिकाणी गेले. कौशीक यांच्या वाहनाचा चालक आणि त्यांच्याबरोबरील सहकारी एका गाडीस मार्ग करून देत असताना भरधाव आलेल्या एका मिनी ट्रकने कौशिक यांना पाठीमागून जोरदार धडक दिली व जवळपास ५० फूट लांब फरपटत नेले. यामध्ये कौशिक हे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


हेही वाचा – देशात कोरोनाच्या Record Break टेस्टिंग; १ दिवसात ५ लाखांहून अधिक चाचण्या!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -