घरताज्या घडामोडीRussia Ukraine Crisis: यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणा; जयंत पाटलांची...

Russia Ukraine Crisis: यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणा; जयंत पाटलांची पंतप्रधानांना विनंती

Subscribe

रशिया आणि यूक्रेनमधील वाद दिवसेंदिवस वाढ आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची परिस्थिती आहे. अशात १८ हजार भारतीय यूक्रेनमध्ये अडकले आहेत. या युध्दजन्य परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदींना हाक दिली आहे. मोदीजी, भारतीय विद्यार्थी हे आपले भवितव्य आहे, त्यांना लवकरात लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा, अशी विनंती जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करून विनंती केली की, मोदीजी विद्यार्थी हे आपले भवितव्य आहे. त्यांना लवकरात लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा. युक्रेनच्या लष्कराने युध्द सुरू झाले असल्याचे पत्रक काढून नागरिकांना सतर्क केले आहे. तर रशियातील बंडखोर यांनीही युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडू नका असे सांगितले जात आहे.

‘रशिया आणि युक्रेन या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात १८ हजारपेक्षा जास्त भारतीय अडकलेले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यांना मदत हवी आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष द्या,’ असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Russia-Ukraine Conflict: यूक्रेनमध्ये तणाव अन् परिणाम भारतात, पेट्रोल-डिझेल, सोन्यासोबतच सर्वसामान्यांच्या कोणत्या गोष्टी महागणार?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -