घरताज्या घडामोडी...तर हिंदू त्यांच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्रं बाळगू शकत नाहीत का? साध्वी प्रज्ञांचे वादग्रस्त...

…तर हिंदू त्यांच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्रं बाळगू शकत नाहीत का? साध्वी प्रज्ञांचे वादग्रस्त विधान

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आणि धर्मप्रचारक यांच्याविरोधात अनेक नेतेमंडळी वक्तव्य करत आहेत. अशातच आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आणि धर्मप्रचारक यांच्याविरोधात अनेक नेतेमंडळी वक्तव्य करत आहेत. अशातच आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. जेव्हा जिहाद पसरवणारे लोक शस्त्र उचलू शकतात, तेव्हा हिंदू त्यांच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्रं ठेवू शकत नाहीत का?, असे वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्यानंतर खासदार साध्वी प्रज्ञा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. (Hindu Community Should Oppose Love Jihad Says Pragya Singh Thakur In Shivamogga Karnataka)

कर्नाटकातील शिवमोग्गा हिंदू जागरण वेदिका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित जनतेला संबोधित करताना खासदार साध्वी प्रज्ञा यांनी वादग्रस्त विधान केले. यावेळी त्या म्हणाल्या की, “हिंदूंना त्यांच्यावर आणि प्रतिष्ठेवर हल्ले करणाऱ्यांना उत्तर देण्याचा अधिकार आहे. तसेच, प्रत्येकाला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे, असे म्हटले. शिवाय, जेव्हा जिहाद पसरवणारे लोक शस्त्र उचलू शकतात, तेव्हा हिंदू त्यांच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्रं ठेवू शकत नाहीत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

“लव्ह जिहाद ही त्यांची परंपरा असून, एखाद्याचे प्रेम असेल तर त्यातही जिहाद करतात. हिंदू देखील प्रेम करतो. आम्ही देवावर प्रेम करतो, संन्यासी आपल्या परमेश्वरावर प्रेम करतात. देवाने निर्माण केलेल्या जगात सर्व अत्याचारी आणि पापींचा अंत करा, अन्यथा इथे प्रेमाची खरी व्याख्या टिकणार नाही”, असेही त्यांनी म्हटले. त्याशिवाय, ” लव्ह जिहादमध्ये सामील असलेल्यांना त्याच पद्धतीनं उत्तर द्या. तुमच्या मुलींचं रक्षण करा, त्यांना योग्य संस्कार शिकवा”, असे आवाहनही, साध्वी प्रज्ञा यांनी केले.

पुढे साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, “हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी धारदार चाकू घरात ठेवावा. आपल्या घरात शस्त्रे ठेवावीत. हिंदूंनाही स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. बाकी काही नाही तर किमान भाजी कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुऱ्या तरी धारदार ठेवाच”, असा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान, याच सल्ल्यामुळे आत भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सोलापूरच्या ‘या’ जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याचे विधान परिषदेत निलंबन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -