घरलाईफस्टाईलतुम्ही निगेटीव्ह लोकांमध्ये वावरत नाहीत ना? कसे ओळखाल

तुम्ही निगेटीव्ह लोकांमध्ये वावरत नाहीत ना? कसे ओळखाल

Subscribe

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी निगेटीव्ह विचारांपासून नेहमी लांब राहावे. पण त्याचबरोबरच निगेटीव्ह माणसांपासूनही दूर राहणे गरजेचे आहे.

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी निगेटीव्ह विचारांपासून नेहमी लांब राहावे. पण त्याचबरोबरच निगेटीव्ह माणसांपासूनही दूर राहणे गरजेचे आहे. पण आपण दररोज कामानिमित्त तर कधी प्रवासानिमित्त अनेक जणांना भेटत असतो.  यातही काहीजणांशी आपले विचार जुळले की त्यांच्याशी आपली मैत्री होती. पण नंतर कधी कधी ती मैत्री आपली डोकेदुखी ठरते. यामुळे अशा व्यक्तींपासून आधीच सावध राहणे चागंले. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिकतेवर तर होतोच शिवाय आपले दैंनंदिन आयुष्यही कठीण होऊन जाते. त्यासाठी समोरची व्यकती निगेटीव्ह आहे हे ओळखता यायला हवं. यासाठी या सहा टीप्स

दुसऱ्यांबाबत चुगल्या करणे
जर तुमच्या आजूबाजूला अशी एखादी व्यक्ती असेल जी सतत दुसऱ्यांबद्ल वाईट बोलते, नाव ठेवते तर वेळीच सावध व्हा. कारण अशा व्यक्तींचे खासगी आयुष्यही अशाच नकारात्मक विचारांनी घेरलेले असते. यामुळे दुसऱ्यांचे वाईट करण्यात ते सुख शोधत असतात.

- Advertisement -

कंट्रोलिंग
निगेटीव्ह व्यक्ती या सतत समोरच्याला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. जर तुमच्या आजूबाजूला असे कोणी असेल जे तुम्ही विचारलेले नसतानाही फुकटचा सल्ला देत असेल तर वेळीच शहाणे व्हा. आपले निर्णय तुम्ही स्वत: घ्या. नाहीतर अशा लोकांपासून दूर राहा.

तुमची प्रगती बघून जळफळणे

- Advertisement -

अशा व्यक्तींना तुमची प्रगती सहन होत नाही. ते सतत तुम्हांला चुकीचा सल्ला देतात. जेणेकरून तुमचे नुकसान होईल. तुमच्याबदद्ल तोंडावर गोड बोलणे आणि तुमची पाठ फिरताच तुमच्याबदद्ल वाईट बातम्या पेरण्याचे उद्योग नकारात्मक व्यक्ती करत असतात.

सतत तक्रार करणे
काहीजणांना प्रत्येक गोष्टीत चुका काढण्याची सवय असते. जर तुम्ही त्यांना खाण्यास काही दिले किंवा गिफ्ट दिले तर ते आधी त्याबद्दल चौकशी करतात. त्यांना तुमच्या भावनांची काळजी नसते. उलट तुम्ही आणलेल्या वस्तू किंवा पदार्थ कसे वाईट आहेत हे सांगण्यात त्यांना आनंद मिळतो.

चांगल्या वेळी अप्रिय गोष्टी करणे
सगळं सुरुळीत सुरू असताना निगेटीव्ह व्यक्ती त्यातही काहीतरी वाईट शोधून काढते. तुमच्या सुखात अशा व्यक्ती दुख शोधतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -