घरदेश-विदेशमधमाशांना समजते 'शून्याची' संकल्पना

मधमाशांना समजते ‘शून्याची’ संकल्पना

Subscribe

मधमाशा म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डाळ्यासमोर येतो चवदार मध. मधमाशांच्या मधाचे अनेक गुणकारी फायदे आहेत हे तर आपण जाणतोच. अनेक संशोधनांमधून मधाचे आरोग्यदायी फायदे आपल्या समोर आले आहेत. मात्र, मधमाशांच्या बाबतीत शास्त्रज्ञांनी आणखी एक आगळावेगळा शोध लावला आहे.

मधमाशांना कळते ‘अंकगणित’

शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधानुसार जगभरातील मधमाशांना शून्य आकड्याची समज असल्याचे समोर आले आहे. एका वैज्ञानिक प्रयोगातून हे सिद्ध झाले आहे की मधमाशांना चक्क अंकगणित समजते. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार मधमाशांचा छोटासा मेंदू कठीणातल्या कठीण गणितीय संकल्पना देखील सहज सोडवू शकतो.

- Advertisement -
सौजन्य – m.phys.org
काय आहे नेमकी ‘भानगड’

काही ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच शास्त्रज्ञांनी हा शोध लावण्यासाठी मधमाशांची एक विशेष चाचणी केली होती. काही मधमाशांना प्रयोगशाळेत एकत्र करत शास्त्रज्ञांनी त्यांच्यावर विविध प्रयोग आणि चाचण्या केल्या. या चाचण्यांनतर समोर आलेल्या अहवालानुसार, मधमशांना आकड्यांची क्रमवारी समज असल्याचं आणि विशेष म्हणजे शून्य हा आकडा अंकांच्या क्रमवारीत सर्वात खाली/ सुरुवातीला असल्याचेही मधमाशांना समजते.

असे होते ‘ते’ खास प्रयोग

शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोंगामध्ये त्यांनी मधमाश्यांना काही आकड्यांचे फलक दिले होते. त्यामध्ये ‘कोणत्या अंकापेक्षा कोणता आकडा लहान अथवा मोठा आहे’ (उदाहरणार्थ- २ < ४ किंवा ४ > २) हे मधमाशांना ओळखायचं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे मधमश्यांनी हे अगदी अचूक पद्धतीने ओळखले. याशिवाय त्यांना काही आकडे क्रमवारीनुसार एका ओळीत लावायचे होते. त्यामध्ये शून्याचाही समावेश होता. मधमाश्यांनी हा टास्क देखील अचूक पार पाडला. मधमाशांनी सर्वात सुरुवातीला ‘0’ हा आकडा ठेवला.

- Advertisement -
सौजन्य – m.phys.org

या प्रयोगाशी निगडीत असलेले मेलबर्नच्या आर.एम.आय.टी. युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अॅडरेन डायर सांगतात, की ”शून्य हा अंक आधुनिक गणितशास्त्राचा आधारस्तंभ आहे. शून्य ही संकल्पना समजणे हे गणित अभ्यासणाऱ्यांचे खूप मोठे कौशल्य आहे. लहान मुलांनाही त्याचा अभ्यास करण्यासाठी काही काळ लागतो. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, शून्याची संकल्पना समजण्यासाठी मधमाशांचा मेंदू पूर्णत: विकसीत असतो.”

‘मधमाशा’ हुशार किटक

अॅडरेन सांगतात, ”मधमाशा या किटक प्रजातीमधील हुशार किटक आहेत. त्यांच्या लहानशा मेंदूंचा जन्मत:च विकास झालेला असतो. त्यामुळे वाढत्या वयानुसार मधमाशा बऱ्याच गोष्टींचं आणि विशेषत: अंकांचं खूप चांगलं आकलन करु शकतात. माणसांच्या मेंदूमध्ये ८६ हजार दशलक्ष चेतापेशी (neurons) असतात, तर मधमाशांच्या मेंदूमध्ये केवळ १ दशलक्ष पेशी असतात. मात्र, आश्यर्याची बाब म्हणजे मधमाशांना अंकांची जाण ही माणसांपेक्षा अधिक चांगली असते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -