घरताज्या घडामोडीINDIA : राहुल गांधींच्या शिवतीर्थावरील सभेवरुन बावनकळेंचा ठाकरेंना सवाल; संजय राऊतांनी असे...

INDIA : राहुल गांधींच्या शिवतीर्थावरील सभेवरुन बावनकळेंचा ठाकरेंना सवाल; संजय राऊतांनी असे दिले उत्तर

Subscribe

मुंबई – काँग्रेस नेते, पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप झाला. इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत आज शिवाजी पार्कवर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी बावनकुळेंना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ट्विट करुन म्हटले आहे की, शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे बाळासाहेब ठाकरे असे समीकरण, यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता.

- Advertisement -

याच शिवतीर्थावरून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली.

‘‘शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन,‘‘ असे रोखठोक बजावणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही शिवतीर्थावर आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करीत नाहीत. यावरुन प्रश्न विचारण्याचे धाडस उद्धव ठाकरे दाखवणार का? बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का? हा सामान्य शिवसैनिकांच्या मनातील प्रश्न आहे. असे ट्विट बावनकुळेंनी केले आहे.

- Advertisement -

बावनकुळेंच्या ट्विटसंबंधी शिवसेनेचे खासदर संजय राऊत यांनी विचारले असता ते म्हणाले, त्यांना काय गांभीर्याने घ्यायचं. त्यांच्या पक्षात त्यांना गांभीर्याने कोणी घेत नाही, त्यांना आम्हीही गांभीर्याने घेत नाही.

हेही वाचा : Sanjay Raut : …तर मोदी, शहांना ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती; राऊतांचा घणाघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -