घरताज्या घडामोडीInflation: सर्फ-साबणाच्या दरात पुन्हा वाढ, महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार

Inflation: सर्फ-साबणाच्या दरात पुन्हा वाढ, महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार

Subscribe

देशातील जनता महागाईमुळे त्रस्त झाली आहे. जानेवारीत किरकोळी महागाई (Retail Inflation) ७ महिन्यांच्या उच्चांकीवर पोहोचली. काही महिन्यांपासून घाऊक महागाई (Wholesale Inflation) १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यादरम्यान सर्वात मोठी एफएमसीजी (FMCG) कंपन्यांमधील एक हिंदुस्तान यूनिलिव्हर (HUL)ने यावर्षी दुसऱ्यांदा साबण आणि सर्फच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यानंतर इतर कंपन्यांनी आपला साबण आणि सर्फचे दर वाढवले आहेत.

मार्केट अॅनालिस्ट फर्म Edeweiss मते हिंदुस्तान यूनिलिव्हरने या महिन्यात सर्फ आणि साबणाच्या दरात ३ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. कंपनीने जानेवारीमध्येही सर्फ आणि साबणाचे दर वाढवले होते. हिंदुस्तान यूनिलिव्हर लक्स, रेक्सोन, पॉन्ड्स, सर्फ एक्सल, विम बार यांसारख्या लोकप्रिय उत्पादन विक्री करते. ज्यांचा वापर घराघरात होता. या महिन्यात लक्स, रेक्सोना, पॉन्ड्स आणि सर्फ एक्सलचे दर वाढवले आहेत.

- Advertisement -

Edelweiss Financial Services कार्यकारी संचालक अवनीश रॉय म्हणाले की, आम्हाला चॅनल चेकमधून समजले आहे की, सर्फ एक्सल ईजी वॉश, सर्फ एक्सल क्विक वॉश, विम बार अँड लिक्विड, लक्स, रेक्सोना, पॉन्ड्स पावडरसह बऱ्याच उत्पादनाचे दर वाढवले आहेत. कंपनीने गेल्या महिन्यात व्हील डिटर्जेंट, पीयर्स साबण आणि सर्फ एक्सलचे दर वाढवले होते. सर्फ एक्सलचे आताही दर वाढवले आहेत.

हिंदुस्तान यूनिलिव्हरवर गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून जवळपास प्रत्येक महिन्याला दर वाढवत आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये १ किलोच्या व्हिल डिटर्जेंटची किंमत ३.४ टक्क्यांनी वाढवली होती. डिसेंबरमध्ये कंपनीने लाईफबॉय साबण, लक्स साबण, सर्फ एक्सल डिटर्जेंट साबण आणि रिन डिटर्जेंट साबणाचे दर ७ ते १३ टक्क्यांपर्यंत वाढवले होते.

- Advertisement -

Edelweiss च्या मुल्यांकनानुसार, ऑक्टोबर-नोव्हेंबर तिमाहीमध्ये हिंदुस्तान यूनिलिव्हरचे उत्पादन वार्षिक ८ टक्के महाग झाले होते. जरी दर वाढवले तरी कंपनीच्या विक्रीवर कोणताच परिणाम झाला नाही. बाजारात हिंदुस्तान यूनिलिव्हरच्या उत्पादनचा दबदबा कायम आहे.


हेही वाचा – International Flights: आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीला परवानगी अपेक्षित, बैठक सत्र सुरू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -