घरताज्या घडामोडीVideo Viral : कर्नाटक विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी काढली रात्र, ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्यासाठी...

Video Viral : कर्नाटक विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी काढली रात्र, ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्यासाठी मागणी

Subscribe

कर्नाटक राज्य राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत आहे. कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी तिरंग्याबाबत वक्तव्य केल्यामुळे राज्यात गोंधळ सुरू आहे. या गोंधळामुळे कर्नाटक विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी रात्र काढली आहे. त्याच्या व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कर्नाटकचे आमदार गाद्या आणि उशांची व्यवस्था करताना दिसत आहेत. तसेच एक आमदार गादीवर झोपलेले दिसत आहेत.

भगवा झेंडा घेऊन केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस आमदारांनी हे पाऊल उचलले आहे. गुरूवारी विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्यानंतरही काँग्रेसचे आमदार सभागृहातच राहीले. आमदारांनी एकच गदारोळ केल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प झाले होते.

- Advertisement -

भविष्यात भगवा ध्वज राष्ट्रध्वज बनू शकतो, असा दावा ईश्वरप्पा यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेत मागणी केली जात आहे. तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत आमदारांनी विधानसभेत रात्र काढली.

- Advertisement -

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी नंतर विधानसभेच्या आवारात विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांच्यासोबत चर्चा केली. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आम्ही सुमारे दोन तास विरोधी पक्षाच्या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना विधानसभेत झोपू नका, असे देखील सांगितले. परंतु त्यांनी आधीच निर्णय घेतल्यामुळे ते तटस्थ राहीले, असं बीएस येडियुरप्पा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सिद्धरामय्या यांनी भाजप आणि संघ परिवारावर राष्ट्रध्वजाचा अनादार केल्याचा आरोप केला आणि या समस्येला तार्तिक अंतापर्यंत नेण्यासाठी काँग्रेसने रात्रभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. असं विधानसभेच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ईश्वरप्पा यांनी राजीनामा देणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची पुढील भूमिका काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : Video : रॉयल कारभार ! पठ्ठ्याचा पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याचा खर्च १.५ लाख, व्हिडिओ व्हायरल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -