घरताज्या घडामोडीInternational Flights: आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीला परवानगी अपेक्षित, बैठक सत्र सुरू

International Flights: आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीला परवानगी अपेक्षित, बैठक सत्र सुरू

Subscribe

कोरोना महामारीमुळे सरकारने मार्च २०२०मध्ये सर्व प्रकारच्या नियमित हवाई उड्डाणांवर निर्बंध लावले होते. त्यानंतर देशांतर्गत उड्डाणांवरील निर्बंध हटवण्यात आले, परंतु आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील निर्बंध कायम राहिले.

देशात आता कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना (Corona) आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे (Omicron) बंद असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाण (International Flights) पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. लवकरच परदेशी प्रवास करणाऱ्या लोकांसाठी दिलासादायक बातमी येऊ शकते. गेल्या २३ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदीला सरकार हटवण्याची शक्यता आहे.

बिझनेसच्या टुडेने दिलेल्या माहितीनुसार, देशात नियमितपणे आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू होऊ शकतात. १ मार्चपासून आंततराष्ट्रीय उड्डाण सुरू होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कोरोना महामारीमुळे सरकारने मार्च २०२०मध्ये सर्व प्रकारच्या नियमित हवाई उड्डाणांवर निर्बंध लावले होते. त्यानंतर देशांतर्गत उड्डाणांवरील निर्बंध हटवण्यात आले, परंतु आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील निर्बंध कायम राहिले. मध्यंतरी सरकारने काही देशांसोबत ‘एअर बबल पॅक्ट’ केले आणि त्यांच्यासोबत काही निवडक उड्डाणे सुरू केली गेली. पण आता सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.

बिझनेस टुडेच्या माहितीनुसार, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशनने (DGCA) नागरी विमान वाहतूक मंत्रालयच्या काही बड्या अधिकाऱ्यांसोबत बैठक केली आहे. पण सध्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय बाकी आहे. याबाबत मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा केली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर सध्या २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Ukraine Warns Russia: रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा वाद; ‘या’ कारणामुळे यूक्रेनने रशियाला दिला इशारा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -