घरदेश-विदेशIAS टॉपर टीना डाबी -अतहर आमीर अखेर विभक्त, घटस्फोटाला कोर्टाची मंजुरी

IAS टॉपर टीना डाबी -अतहर आमीर अखेर विभक्त, घटस्फोटाला कोर्टाची मंजुरी

Subscribe

युपीएससी (UPSC)परीक्षेत २०१६ साली टॉप केल्याने चर्चेत आलेल्या राजस्थानचे केडरचे आयएएस अधिकारी (IAS) अधिकारी पती-पत्नी टीना डाबी आणि अतहर आमीर अखेर कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. जयपूरच्या फॅमिली कोर्टाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आहे. घटस्फोटासाठी दोघांनी २० नोव्हेंबर २०२० रोजी परस्पर संमतीने फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी फॅमिली कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला संमती दर्शवली.

दिल्लीच्या टीना डाबी यांनी २०१६ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळावला होता. तर जम्मू-काश्मीरचे रहिवासी अतहर आमीर यांनी याच परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावला होता. दोघेही २०१६ च्या बॅचचे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. यातच आयएएस प्रशिक्षणादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि अखेर एप्रिल २०१८ साली त्यांनी लग्न केलं. त्यावेळी दोघांच्या लग्नाची अधिक चर्चा झाली होती. कारण पंतप्रधान मोदींपासून ते अनेक नामवंत लोकांनी या लग्नात उपस्थिती दर्शवली होती. काश्मीरच्या पहलगावमध्ये या दोघांचा शाही विवाह सोहळा झाला होता.

- Advertisement -

मात्र काही कारणास्तव त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण आणि गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी विभक्त होण्याची निर्णय घेतला. त्यानुसार परस्पर संमतीने जयपूरच्या फॅमिली कोर्टात त्य़ांनी घटस्फोटासाठी अर्ज केला.सध्या टीना डाबी वित्त विभागात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर घटस्फोटाची याचिका दाखल होताच काही महिन्यांनी अतहर आमिर प्रतिनियुक्तीवर जम्मू-काश्मीला गेले.युपीएससी परीक्षेत अव्वल स्थान पटकवणाऱ्या टीना डाबी सतत माध्यमांच्या प्रकाशझोतात होत्या. लग्नानंतर टीना डाबी यांनी आपल्या इंस्टाग्रामवर स्वत:ला ‘काश्मिरी सून’ म्हणूनही ओळखले जाते.


शेख इस्माईलचं हेलिकॉप्टर निर्मितीचे स्वप्न अपूर्ण, चाचणीदरम्यान अपघातात मृत्यू


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -