घरताज्या घडामोडी१५ ऑगस्टपासून लोकल प्रवासासाठी पालिकेची सर्व यंत्रणा कार्यरत - महापौर

१५ ऑगस्टपासून लोकल प्रवासासाठी पालिकेची सर्व यंत्रणा कार्यरत – महापौर

Subscribe

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास द्या, अशी मागणी नागरिक करत होते. या मागणीची दखल घेत ठाकरे सरकारने १५ ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा केली. आजपासून ऑफलाईन लोकल रेल्वे पास वितरणाला सुरुवात झाली आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या सर्व यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

१५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास मिळण्याकरत आजपासून रेल्वे पास मिळण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील सर्व स्थानकांवर पास मिळत असून सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत सलग दोन सत्रांमध्ये रेल्वे पास मिळणार आहे. यासाठी लसीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. सध्या स्थानकांवर महापालिकेचे कर्मचारी लसीकरणाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करताना दिसत आहेत. त्यामुळे पास देणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षाही महत्त्वाची असं म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी कर्मचाऱ्यांना डबल मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांना देखील पाससाठी गर्दी न करता नियमांचे पालन करून पास घेण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

लोकल पास मिळण्याकरता मुंबई महापालिका क्षेत्रातील ५३ रेल्वे स्थानकांवर ३५८ मदत कक्ष असून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात एकूण १०९ स्थानकांवर मदत कक्ष तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकस पाससाठी गर्दी करू नका, असे महापौरांनी सांगण्यात आले आहे. जर पाससाठी बनावट कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र आढळल्यास कठोर पोलीस कारवाई केली जाणार आहे.


हेही वाचा – सामान्य नागरिकांना रेल्वे तिकीट मिळणार नाही – अतिरिक्त आयुक्त

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -