घरदेश-विदेशकन्टेन्मेंट झोनमधील ३० टक्के कोरोनाग्रस्त आपोआप कोरोनामुक्त, ICMR चा खुलासा

कन्टेन्मेंट झोनमधील ३० टक्के कोरोनाग्रस्त आपोआप कोरोनामुक्त, ICMR चा खुलासा

Subscribe

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च द्वारे करण्यात आलेल्या एका सामुदायिक नॅशनल सीरो सर्व्हे मधून माहिती आली समोर

देशात कंटन्मेंट झोनमधील १५ ते ३० टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली असून या व्यक्ती आपोआप कोणत्याही उपचारांशिवाय बऱ्या झाल्या असल्याचे ICMR च्या sero-survey मधून स्पष्ट झाले आहे. ICMR म्हणजे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च द्वारे करण्यात आलेल्या एका सामुदायिक नॅशनल सीरो सर्व्हे मधून ही माहिती समोर आली आहे.

ICMR चा sero-survey अहवाल

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालावरून असे सांगण्यात येत आहे की, देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामध्ये ICMR ने केलेला हा खुलासा अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच, कन्टेन्मेंट झोनमधील ३० टक्के कोरोनाग्रस्त आपोआप कोरोनामुक्त झाल्याची माहिती ICMR च्या अहवालातून समोर आली आहे. तर मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, कोलकत्ता, चेन्नई, सुरत, जयपूर आणि इंदोर यांसारख्या शहरांच्या हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंट झोनमधून मिळणाऱ्या आकड्यांच्या हवाल्याने हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

- Advertisement -

IgG अॅन्टीबॉडिजचा शोध घेण्यासाठी केला सर्वे

ICMR च्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, हा सर्वे रुग्णांकडून घेण्यात आलेल्या रक्तांच्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-2च्या विरोधात तयार होणाऱ्या IgG अॅन्टीबॉडिजचा शोध घेण्यासाठी करण्यात आला होता. यावेळी देशाच्या ७० जिल्ह्यांमधून साधारण २४ हजार नमूने घेण्यात आले होते.

दरम्यान, IgG अॅन्टीबॉडिज रुग्णांच्या शरीरात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी तयार होतात. हे शरीरामध्ये संसर्ग झाल्यानंतर १४ दिवसांनी दिसतात आणि संसंर्ग संपल्यानंतरही अनेक महिन्यांपर्यंत रुग्णांच्या रक्तात सीरममध्ये राहत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

ICMR द्वारे केलेला पहिला नॅशनल वाइड सीरो सर्व्हे

ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, ICMR द्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेच्या प्राथमिक निष्कर्षांच्या आधारावर असा दावा करण्यात आला की, कन्टेन्मेंट झोनमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा दर जास्त आहे, हॉटस्पॉटच्या तुलनेत १०० पटींनी जास्त संसर्ग झाल्याचे देखील आढळून आले आहे. ICMR द्वारे करण्यात आलेला पहिला नॅशनल वाइड सीरो सर्व्हे असून त्याचा अहवाल युनियन कॅबिनेट सेक्रेटरी आणि पीएमओलाही पाठवण्यात आला आहे.


धक्कादायक! कोरोनाग्रस्ताची हत्या, शवविच्छेदनापूर्वी मृतदेह हॉस्पिटलमधून बेपत्ता!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -