घरताज्या घडामोडीधक्कादायक! कोरोनाग्रस्ताची हत्या, शवविच्छेदनापूर्वी मृतदेह हॉस्पिटलमधून बेपत्ता!

धक्कादायक! कोरोनाग्रस्ताची हत्या, शवविच्छेदनापूर्वी मृतदेह हॉस्पिटलमधून बेपत्ता!

Subscribe

या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशाची आर्थिक असलेल्या एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांहून अधिक आहे. तर राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ८८ हजारांहून अधिक आहे. एकाबाजूला कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. दरम्यान ३ जूनला गोवंडी येथे एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर रुग्णाचा मृतदेह घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला होता. पण या घटनेच्या पाच दिवसानंतर या रुग्णाचा मृतदेह हॉस्पिटलमधून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या रुग्णाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यापूर्वीच हॉस्पिटलमधून बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडले?

३ जूनला गोवंडी येथे २३ वर्षीय मृत व्यक्ती मेहराजय इजाज अहमद शेख याच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. या घटनेनंतर घाटकोपरमधील राजवाडी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. पण त्याचा तिथेच मृत्यू झाला. मग राजवाडी हॉस्पिटलच्या प्रशासनाने त्याचा मृतदेह कोरोना चाचणी आणि शवविच्छेदनासाठी शवागृहात ठेवला. त्यानंतर मृत मेहराज शेख याचा ७ जूनला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मग यानंतर शवविच्छेदन करण्याकरिता मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलीस आणि मृताचे नातेवाईक हॉस्पिटलच्या शवगृहात गेले. पण शवगृहात मृतदेह बेपत्ता झाल्याचे आढळले. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात मृताच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर राजवाडी हॉस्पिटलच्या शवकक्ष परिचर आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याप्रकणी महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. महानगरपालिकेच्या राजावाडी आणि कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयातून कोरोना रुग्ण पळून जाणे तसेच कोरोना रुग्णांचा मृतदेह बेपत्ता होणे या प्रसारमाध्यमातून समजलेल्या घटना अतिशय संतापजनक असून यासंदर्भात योग्य ती चौकशी करून दोषी असलेल्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे. कांदिवलीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयाला महापौरांनी आज भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – उल्हासनगरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आढळली मुदत संपलेली इंजेक्शनं!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -