घरताज्या घडामोडीमुंबई मेट्रो प्रकल्पासाठी जपानमधून रूळ दाखल

मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी जपानमधून रूळ दाखल

Subscribe

कुलाबा वांद्रे सिप्झ या प्रकल्पाअंतर्गत मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाअंतर्गत पहिला रेल्वे रूळांचा संच मुंबईत दाखल झाला आहे. मितसुई कंपनीकडून हा रूळांचा संच जपान येथील यावाटा मधून सागरी वाहतूकीच्या मार्गाने निघाला होता. मुंबई बंदरावर दाखल व्हायला या संचाला ४ आठवड्याचा कालावधी लागला. महाराष्ट्र शासनाने कोव्हिड-१९ साठी नेमून दिलेल्या नियमावली नुसार हा रेल्वे रूळांचा संच काही दिवसात मुंबई बंदरातून बीकेसी येथील एमएमआरसीच्या यार्डात दाखल होईल.

“रूळ यंत्रणा उच्च प्रतीची आणि अत्यल्प कंपने देणारी हाय एटीन्यूएशन लो व्हायब्रेशन पद्धतीची असून भारतात ही यंत्रणा प्रथमच वापरण्यात येत आहे. मेट्रो धावत असताना कमीत कमी कंपने आणि ध्वनी निर्माण करणे ही देखील या यंत्रणेची खासियत आहे. मुंबईतील प्राचीन वास्तु यांना इजा न पोहोचण्याच्या दृष्टीनेही ही यंत्रणा उपयुक्त आहे”, अशी माहिती या प्रसंगी बोलताना एमएमआरसी चे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली. अचूक तापमान नियंत्रण आणि मजबुती ही वैशिष्ठ्ये असलेली ३६१५ मे. टन वजन असलेल्या हेड हार्डन (एच एच) प्रकारच्या रुळ यंत्रणेचे आगमन हे मुंबई मेट्रो ३ च्या पूर्णत्वाच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा आहे. उर्वरित ७१२५ मे. टन वजनाचे रूळ दोन संचांमध्ये यंदा वर्ष अखेरीस मुंबईत दाखल होतील.

- Advertisement -

रूळांची यंत्रणा इतर सामान्य यंत्रणांच्या तुलनेत २० ते २२ व्हीडीबी इतकी कंपन गति कमी करणारी असून सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. तसेच जलद आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई मेट्रो ३ च्या बांधकाम पूर्णत्वाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -