घरताज्या घडामोडीजोपर्यंत आपण चीनवर अवलंबून राहू, तोपर्यंत आपल्याला त्यांच्या समोर झुकावे लागणार -...

जोपर्यंत आपण चीनवर अवलंबून राहू, तोपर्यंत आपल्याला त्यांच्या समोर झुकावे लागणार – मोहन भागवत

Subscribe

आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन (75th Independence Day) आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या हस्ते मुंबईतील राजा शिवाजी शाळेत ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी यांनी स्वातंत्र्य दिनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत आपण चीनवर अवलंबून राहून तोपर्यंत आपल्याला त्यांच्या समोर झुकावे लागेल. भारताच्या स्वातंत्र्याविषयी बोलताना त्यांनी चीनवरील निर्भरताबाबत प्रश्न उपस्थितीत केला. भागवत म्हणाले की, आपण किती चीनच्याबाबत ओरडलो, तरी आपल्या फोनमधील ज्या वस्तू आहेत, त्या चीनहून येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून राहून तोपर्यंत चीनच्या समोर झुकावे लागेल.

यासोबत पुढे मोहन भागवत म्हणाले की, ‘स्वदेशीचा अर्थ सर्वकाही सोडून देणे असा नाही आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू राहिल, परंतु आपल्या अटींवर सुरू राहिल. यासाठी आपल्याला आत्मनिर्भर बनावे लागेल. आत्मनिर्भरतामुळे रोजगार निर्माण होतो. नाहीतर आपली नोकरी जाते आणि हिंसेचा रस्ता खुला होतो. स्वदेशीचा अर्थ हा आत्मनिर्भरता आणि अहिंसा आहे.’

- Advertisement -

दरम्यान भारत आणि चीन दरम्यानच्या नियंत्रण रेषेवर (IAC) रक्षणासाठी तैनात आयटीबीपीच्या २० सैनिकांना गेल्या वर्षी लडाख क्षेत्रात दोन्ही देशांच्या सैन्यामधील संघर्ष दरम्यान शौर्य दाखवल्यामुळे पोलीस पदक (पीएमजी)ने सन्मानित केले गेले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र आणि राज्य पोलीस दलांसाठी एकूण १ हजार ३८० पोलीस पदकं घोषित केले आहेत. यामध्ये दोन राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएमजी), ६२८ पोलीस शौर्य पदक (पीएमजी), ८८ विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम) आणि ६६२ पोलीस प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक (पीएम) जाहीर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ७८ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदकांची घोषणा, मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -