घर देश-विदेश मोदींवरील टीकेचा परिणाम; काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित

मोदींवरील टीकेचा परिणाम; काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित

Subscribe

नवी दिल्ली | लोकसभेतील काँग्रेसचा गट नेता अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांचे निलंबन करण्यात आले आहे. सभागृहातील अधीर रंजन चौधरी वक्तव्यावर आक्षेप घेतला. या पार्श्वभूमीवर अधीर रंजन चौधरी यांच्यावर प्रस्ताव आणल्यानंतर अवाजवी मतदान घेतले आणि त्यांना निलंबित करण्यात आले. त्याचबरोबर विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावर अवाजवी मतदान घेतल्यानंतर  सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात दोन तास भाषण केली. पंतप्रधानांनी भाषणातून यांनी मणिपूर हिंसाचार, काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

अधीर रंजन चौधरी यांच्या विधानावर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आक्षेप घेतला. प्रल्हाद जोशींनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला. काँग्रेस खासदाराला सभागृहातून निलंबित करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला. समितीचा अहवाल येईपर्यंत अधीर रंजन यांना निलंबित करावे, असे ते म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रल्हाद जोशींचा प्रस्तावावर अवाजवी मतदान केले आणि यानंतर अधीर रंजन चौधरींना निलंबित करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – “5 वर्षं दिली तरीही विरोधकांची तयारी नाही”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला

नेमके काय आहे प्रकरण

आज संसदेत बोलताना अधीर रंजन चौधरींनी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अधीर रंजन चौधरी म्हणाले, “निरव मोदी पैसे घेऊन पळून गेला. भाजप सरकारने काही केले नाही. मला आता कळाले की, निरव मोदी भारतातच आहे. नरेंद्र मोदींच्या रुपात निरव मोदी जिवंत आहे. नरेंद्र मोदी निरव मोदी बनून अजूनही गप्प बसले आहेत, अशी टीका त्यांनी टीका केली. यानंतर काँग्रेस नेत्याच्या अधीर रंजन चौधरींच्या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ सुरू झाला. त्याचवेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहात सांगितले की, पंतप्रधान हे उच्चाधिकारी आहेत. हे संपले पाहिजे आणि चौधरींनी माफी मागितली पाहिजे. पंतप्रधानांवर बिनबुडाचे आरोप मान्य करता येणार नाहीत. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, हे रेकॉर्डबाहेर काढण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – देशातील जनतेचा काँग्रेसवरील अविश्वासाचा खूप मोठा इतिहास; कॉंग्रेसचे सरकार नसलेल्या राज्यांचा वाचला मोदींनी पाढा

काँग्रेसकडून चौधरींचा अपमान 

पंतप्रधान पुढे म्हणाले, “अधीर रंजन चौधीर यांना बाजूला का? केले हेच कळत नाही. काय माहिती कलकत्त्यातून फोन आला असेल”, असे म्हणत मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. “काँग्रेस सतत अधीर रंजन चौधरी यांचा अपमान करते. मग कधी निवडणुकीच्या नावावर त्यांना काही काळासाठी विरोधी पक्ष नेते पदावरून हटवून टाकते. आम्ही अधीर रंजन चौधरी यांच्या प्रति पूर्ण संवेदना व्यक्त करतो”, असे पंतप्रधान म्हणाले.

- Advertisment -