घरदेश-विदेशइम्रान खान यांची ढासळती तब्येत बघून घाबरलं पाकिस्तानी सरकार; देणार 'या' सुविधा

इम्रान खान यांची ढासळती तब्येत बघून घाबरलं पाकिस्तानी सरकार; देणार ‘या’ सुविधा

Subscribe

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जेलमध्ये घरचं जेवण मिळत नाही. चांगल्या सुविधा नाहीत याबाबत कोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच, त्यांच्या वकिलांकडूनही वारंवार तक्रार केली जात होती. आता इम्रान खान यांची ढासळती तब्येत बघून पाकिस्तान सरकार घाबरल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानी सरकार आता इम्रान खान यांना अधिक सुविधा पुरवत आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जेलमध्ये घरचं जेवण मिळत नाही. चांगल्या सुविधा नाहीत याबाबत कोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच, त्यांच्या वकिलांकडूनही वारंवार तक्रार केली जात होती. आता इम्रान खान यांची ढासळती तब्येत बघून पाकिस्तान सरकार घाबरल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानी सरकार आता इम्रान खान यांना अधिक सुविधा पुरवत आहे. (Imran Khan does not get homemade food in Jail Pakistan PTI Chief Imran Khan given new facilities in attock jail after bushra bibi appeal)

इम्रान खान यांना तुरुंगात अनेक सुविधा दिल्या जात आहेत. याअंतर्गत इम्रान खान यांच्यासाठी तुरुंगात आधुनिक शौचालय बांधण्यात आले आहे. पंजाबचे आयजी तुरुंग मियां फारुख नजीर यांनी रविवारी इम्रान खान अटकेत असलेल्या तुरुंगाला भेट दिली. मियां फारुख नजीर यांनी सांगितले की, इम्रान खान यांनीही तुरुंगात त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

इम्रान खानच्या तुरुंगात नवीन शौचालय

तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खानच्या तुरुंगाबाहेर लावण्यात आलेला सुरक्षा कॅमेरा बदलण्याचाही आढावा घेतला जात आहे. इमरान खान यांनी आरोप केला होता की सुरक्षा कॅमेऱ्यामुळे त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केले जात आहे. कारण त्यांच्या टॉयलेटची भिंत खूपच लहान आहे आणि तुरुंगातील सर्व काही सुरक्षा कॅमेऱ्यातून दिसत आहे. यानंतर इम्रान खानच्या जेल सेलमध्ये आधुनिक टॉयलेट बांधण्यात आले असून त्या ठिकाणाहून कॅमेरा हटवण्याचा आढावा घेण्यात येत आहे.

याशिवाय इम्रान खानला तुरुंगाच्या नियमानुसार गादी, उशी, चादर, खुर्ची आणि कूलर देण्यात आला आहे. तसंच, इम्रान खानला पंखा, प्रार्थनेसाठी खोली, पवित्र कुराण आणि पुस्तके तसेच वर्तमानपत्र, खजूर, मध, टिश्यू पेपर आणि परफ्यूम देण्यात आले आहेत. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांनी तुरुंगात दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

पत्नी बुशरा बीबीचं प्रतिज्ञापत्र

इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन सांगितले होते की, तुरुंगात त्यांच्या पतीची प्रकृती बिघडत आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. प्रतिज्ञापत्रात सर्वोच्च न्यायालयाकडे या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, इम्रान खानच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी पाच डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे, त्यातील प्रत्येकजण आठ तासांच्या शिफ्टमध्ये तैनात आहे. आयजी जेलच्या परवानगीनंतर पीटीआय प्रमुखांना विशेष जेवणही दिले जात आहे. इम्रान खान यांना दिले जाणारे अन्न डॉक्टरांच्या विशेष पथकाद्वारे तपासले जाते. विशेष म्हणजे इम्रान खानच्या पत्नीने तुरुंगात इम्रान खान यांच्यावर विषप्रयोग केला जाण्याची भीती व्यक्त केली होती.

तोषखाना प्रकरणात दोषी आढळल्यानंतर इम्रान खान पंजाबच्या अटॉक तुरुंगात तीन वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्यांना पाच वर्षांसाठी राजकारणातूनही अपात्र ठरवण्यात आले आहे.

(हेही वाचा: कर्नाटकहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात थांबला दोन वर्षीय चिमुकलीचा श्वास; ‘ते’ पाच जण बनले देवदूत )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -