घर देश-विदेश INDIA alliance : मोदी काय साध्य करीत आहेत? ठाकरे गटाचा हल्लाबोल

INDIA alliance : मोदी काय साध्य करीत आहेत? ठाकरे गटाचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई : मुंबईत इंडियाची बैठक सुरू असताना संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा करून खळबळ माजवायचा प्रयत्न मोदी सरकारने केला; पण खळबळ काय, साधा बुडबुडाही फुटला नाही. ऐन गणेशोत्सवात असे विशेष अधिवेशन बोलावून मोदी काय साध्य करीत आहेत? असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Jet Airways चे संस्थापक नरेश गोयल यांना अटक, ‘या’ प्रकरणी EDकडून कारवाई

- Advertisement -

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास उत्तेजन दिले ते लोकांत जागृती निर्माण व्हावी म्हणून. महिनाभर आधी पुण्यात येऊन टिळक पुरस्कार स्वीकारणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना याचा विसर पडला व महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या धामधुमीत त्यांनी संसदेचे विशेष सत्र बोलावून महाराष्ट्राच्या सार्वजनिक भावनांचा अपमान केला व इंडिया आघाडीसही अपशकून करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आली आहे.

ही विकृतीच

महाराष्ट्रावर त्यांचा दात आहेच व ते गणपतीचे आगमनही निर्विघ्न पार पाडू देत नाहीत. ऐन गणपतीत महाराष्ट्राच्या खासदारांनी दिल्लीत येऊन मोदींची प्रवचने ऐकायची? बरे, ते प्रवचने झोडायला संसदेतही येत नाहीत. आता लोकांना गणेशोत्सवही ते साजरा करू देणार नाहीत. ही एक विकृतीच आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून पत्नीची हत्या; मग केली आत्महत्या, वाचा…

मोदींचे माथेफिरूपणाचे निर्णय

‘इंडिया’ आघाडीतील 28 राजकीय पक्षांमुळे देशातील हुकूमशाही प्रवृत्तीपुढे आव्हान उभे केलेच आहे. तसे नसते तर असे माथेफिरूपणाचे निर्णय मोदींनी घेतले नसते. मुंबईत उद्धव ठाकरे यांनी यजमानपद भूषवलेल्या या बैठकीने अनेक जळमटे दूर केली. एक दिशा स्पष्ट झाली. आपण एकत्र आलो नाही तर हुकूमशहा आपल्याला गिळून टाकील. आधी देश वाचवायला हवा ही भावना राष्ट्रभक्त पक्षांत निर्माण झाली, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

देशाला पुन्हा धर्माच्या गुंगीत अडकवण्याचा प्रयत्न

पंतप्रधान मोदींची धार्मिक लोटांगणे वगैरे सगळे ढोंग आहे. देश पुन्हा धर्माच्या गुंगीत अडकवून तरुण पोरांना दंगेखोर बनवायचे व देशाची सर्व संपत्ती आपल्या दोस्त मंडळींना लुटण्याची मुभा द्यायची, हे आजचे चित्र आहे. त्या विरोधात ‘इंडिया’ आघाडी उभी ठाकली आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisment -