घरCORONA UPDATEभारताने कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत ब्रिटनला टाकलं मागे, सर्वाधिक रुगसंख्येत चौथ्या स्थानावर!

भारताने कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत ब्रिटनला टाकलं मागे, सर्वाधिक रुगसंख्येत चौथ्या स्थानावर!

Subscribe

भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. जगभरातील कोरोनाबाधितांच्या यादीत भारत आता चौथ्या क्रमांकावर असून भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात कोरोनाचे २ लाख ९७ हजार ८३२ रुग्ण आढळले आहेत. तर ८ हजार ४९८ जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच आतापर्यंत १ लाख ४६ हजार ६६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

भारतात सर्वाधित कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने वुहानला मागे टाकले आहे. गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे ३ हजार ६०७ नवे रुग्ण आढळले असून १५२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९७ हजार ६४८ झाली असून मृतांची संख्या ३ हजार ५९०वर पोहोचली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या एकट्या मुंबईत कोरोनाचे ५३ हजार ९८५ रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

देशात महाराष्ट्राच्या पाठोपाठ सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या राज्यात आढळले आहे. तमिनाळडूत ३८ हजार ७१६, दिल्लीत ३४ हजार ६८७ आणि गुजरातमध्ये २२ हजार ६७ कोरोनाबाधित रुग्ण आहे.

जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त १० देश

अमेरिका : कोरोनाबाधित – २,०७६,६९४ – मृत्यू – ११५,५४७
ब्राझील : कोरोनाबाधित – ७८७.४८९ – मृत्यू – ४०,२७६
रशिया : कोरोनाबाधित – ५०२,४३६ – मृत्यू – ६,५३२
भारत : कोरोनाबाधित – २९७,८३२ – मृत्यू – ८,४९८
ब्रिटन : कोरोनाबाधित – २९१,४०९ – मृत्यू – ४२,२७९
स्पेन : कोरोनाबाधित – २४२,७०७ – मृत्यू – २७,१३६
इटली : कोरोनाबाधित- २३६,१४२ – मृत्यू – ३४,१६७
पेरू : कोरोनाबाधित – २०८,८२३ – मृत्यू – ५,९०३
फ्रान्स : कोरोनाबाधित – १८७, ९९६ – मृत्यू – २९,३१९
जर्मनी : कोरोनाबाधित- १८६,६४८ – मृत्यू – ८,८४९

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनामुळे ‘या’ महिन्यापर्यंत २ लाख रूग्णांचा बळी जाण्याची शक्यता!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -