घरताज्या घडामोडीचीन-पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठी भारत करणार ‘एवॅक्स’ सिस्टमची खरेदी

चीन-पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठी भारत करणार ‘एवॅक्स’ सिस्टमची खरेदी

Subscribe

चीन आणि पाकिस्तानपासून वाढता धोका लक्षात घेऊन आता भारताने इस्रायलकडून आणखी दोन ‘फाल्कन’ एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (एवॅक्स) विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

चीन आणि पाकिस्तानपासून वाढता धोका लक्षात घेऊन आता भारताने इस्रायलकडून आणखी दोन ‘फाल्कन’ एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (एवॅक्स) विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार; आंतरमंत्रालयीन समितीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर इस्रायलबरोबर ‘एवॅक्स’ सिस्टिमचा करार करण्यासाठी सुरक्षेवरील मंत्रिमंडळ समितीची मंजुरी मिळणार असल्याचे सांगितले आहे.

यामुळे करार रखडला होता

एवॅक्स सिस्टिमला आकाशातील भारताचे नेत्र म्हटले जाते. विशेष म्हणजे महागड्या किंमतीमुळे हा करार बऱ्याच काळापासून प्रलंबित होता. साधारणत: हा एक अब्ज डॉलरचा करार असल्याचे बोले जात आहे. ही इस्रायली एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम रशियन बनावटीच्या इल्यूसीन-७६ विमानावर बसवण्यात येणार असून आंतरमंत्रालयीन समितीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर इस्रायलबरोबर एवॅक्स सिस्टिमचा करार करण्यासाठी सुरक्षेवरील मंत्रिमंडळ समितीकडून आता मंजुरी मिळणार आहे.

- Advertisement -

भारताकडे आता एवॅक्सची संख्या पाच झाली

दोन नव्या फाल्कन सिस्टिमच्या समावेशानंतर आता भारताकडे असलेल्या एवॅक्सची संख्या पाच झाली आहे. इंडियन एअर फोर्स आधीपासून अशा तीन सिस्टिम वापरत असून भारताला पुढच्या तीन ते चार वर्षात इस्रायलकडून ही एवॅक्स सिस्टिम देखील मिळेल. महत्त्वाचे म्हणजे सध्या वापरत असलेल्या तीन फाल्कन एवॅक्स सिस्टिमपेक्षा अधिक अत्याधुनिक असतील असे सूत्रांनी सांगितले आहे. सांगितले. बालाकोट एअर स्ट्राइक, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी फायटर विमानांबरोबर झालेली डॉगफाइट आणि आता लडाख सीमारेषेवर चीन बरोबर निर्माण झालेला तणाव त्या पार्श्वभूमीवर आणखी एवॅक्स फाल्कन सिस्टिमची गरज असल्याचे बोले जात आहे.


हेही वाचा – पत्रप्रयोग म्हणजे चार हौशा-गवशांनी बसविलेला ‘एकच प्याला’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -