घरदेश-विदेशभारत करणार श्रीलंकेतील 'त्या' विमानतळाची देखरेख?

भारत करणार श्रीलंकेतील ‘त्या’ विमानतळाची देखरेख?

Subscribe

श्रीलंकेच्या मट्टाला आंतरराष्ट्रीय विमानतळाला भारताचा आधार मिळणार आहे. या विमानतळाच्या देखरेखीची जबाबदारी भारत आणि श्रीलंका हे दोन्ही देश मिळून घेणार आहेत. त्यासंबंधीची चर्चा दोन्ही देशातील शिष्ठमंडळांमध्ये सुरू आहे.

श्रीलंकेतील मट्टाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळाला घरघर लागली असून तोट्यात असणारे हे विमानतळ आता भारत आणि श्रीलंका संयुक्तरीत्या चालवणार असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही देशांमध्ये यासंबंधी बोलणी होण्याची शक्यता आहे. भारत सरकारमधील एक शिष्ठमंडळ सध्या श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे उपस्थित असून श्रीलंकेचे परिवहन उपमंत्री अशोक अभयसिंघ यांनी त्यांच्या संसदेत ही माहिती दिली. संसदेच्या प्रश्नोत्तर सदरात विरोधकांनी मट्टाला विमानतळाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. हे विमानतळ कायमस्वरूपी बंद करून विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे का, असे विरोधकांने विचारले होते. त्यावर उत्तर देताना अभयसिंघ यांनी सांगितले की, भारताने मट्टाला विमानतळ श्रीलंकेच्या मदतीने चालवण्याची इच्छा दर्शवली आहे. तसेच तोट्यात असले तरीही हे विमानतळ कधीही विकले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

mattala international airport
मट्टाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळ (प्रातिनिधिक चित्र)

विमानतळावर तब्बल २१ कोटी खर्च

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांच्या नावावरून मट्टाला विमानतळाचे नाव ठेवण्यात आले आहे. हे विमानतळ चीनच्या सबहकाऱ्याने बनवण्यात आले असून यासाठी तब्बल २१ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र येथून विमान उड्डाणं कमी होत असल्यामुळे हळूहळू हे विमानतळ बंद पडण्याच्या मार्गावर आले आहे. मट्टाला हे श्रीलंकेतील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ असून सध्या तोट्यात सुरू असलेल्या या विमानतळावरील उड्डाणं सुरक्षेच्या कारणास्तव मे महिन्यापासून स्थगीत करण्यात आली आहेत. गेल्याच वर्षी २०१७ साली सरकारने या विमानतळाच्या देखरेखीसाठी गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागवले होते. मात्र त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही.

- Advertisement -
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद राजपक्षे

श्रीलंकेवर चीनचे कर्ज

दरम्यान, चीनच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हंबंटोटामध्ये बांधण्यात आलेला बंदर चीनला लीज्ड करण्यात आला आहे. सरकारचा हा व्यवहारही राजपक्षांना आवडला नाही. राजपक्षे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी, चीनमधील राष्ट्रीय संपत्तीची विक्री करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -