घरदेश-विदेशराष्ट्रपती पदाच्या शर्यतीतून शरद पवार बाहेर; विरोधी पक्षांच्या बैठकीत आज नव्या नावावर...

राष्ट्रपती पदाच्या शर्यतीतून शरद पवार बाहेर; विरोधी पक्षांच्या बैठकीत आज नव्या नावावर चर्चा?

Subscribe

ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या 8 मुख्यमंत्र्यांसह 22 नेत्यांना पत्र लिहून बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली होती

देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणुक १८ जुलै रोजी होणार आहे. मात्र या निवडणुकीवरून देशाचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. याबाबत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु केलेत. याच पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांनी 15 जूनला दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. (mamata banerjee delhi meeting)

पश्चिम बंगाल विधानसभेत मोठा विजय मिळवल्यापासून ममता बॅनर्जी विरोधकांना एकत्र करण्यात गुंतल्या आहेत. दरम्यान त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली तर त्यांनी शरद पवारांशी देखील चर्चा केली, वेळोवेळी पत्र लिहून इतर नेत्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात होणारी ही बैठकही याच पार्श्वभूमीवर होणार आहे. (president election 2022)

- Advertisement -

ममता बनर्जींकडून पवारांना उमेदवार होण्याची ऑफर

या बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनण्याची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे, मात्र गेल्या वेळेप्रमाणे त्यांनी ही ऑफर धुडकावून लावली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेलाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवे अशी इच्छा आहे.

त्यांना विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार म्हणून घोषित केले जाऊ शकते, असे बोलले जात होते, मात्र ममता यांचा प्रस्ताव फेटाळल्याने त्यांच्या नावाच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे. अशा स्थितीत आज होणाऱ्या या बैठकीत अध्यक्षपदासाठी नव्या नावावर चर्चा होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

ममता यांनी विरोधी पक्षांच्या 8 मुख्यमंत्र्यांसह 22 नेत्यांना बोलावले

ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या 8 मुख्यमंत्र्यांसह 22 नेत्यांना पत्र लिहून बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. ममतांनी ज्या नेत्यांना पत्र लिहिले आहे त्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा समावेश आहे. सपा प्रमुख अखिलेश यादवही या बैठकीला उपस्थित राहू शकतात. (presidential candidate)

या बैठकीला काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश आणि रणदीप सिंग सुरजेवाला उपस्थित राहू शकतात. याशिवाय आरएलडी नेते जयंत चौधरी यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. याशिवाय कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा या बैठकीत सहभागी होणार आहेत.

18 जुलैला मतदान, 21 जुलैला मतमोजणी

निवडणूक आयोगाने देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. पुढील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार 29 जूनपर्यंत अर्ज भरू शकतील. 30 जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 2 जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

गुलाम नबी आझाद यांच्या नावाचीही चर्चा

सध्या विरोधकांचा असा एक भाग आहे जो संयुक्त उमेदवार उभा करण्याचा सल्ला देत आहे, परंतु त्यांना त्या पदावर काँग्रेसचा कोणीही पाहायचा नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांचे नाव पुढे केल्याचेही वृत्त आहे. आझाद यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार व्हावे, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. यावर काँग्रेसने अद्याप आपले मत स्पष्ट केलेले नाही.


अनिल परबांना ईडीचा समन्स, उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -