घरताज्या घडामोडीराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांची रणनिती, एनडीएला करणार पराभूत

राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांची रणनिती, एनडीएला करणार पराभूत

Subscribe

देशपातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वात असलेल्या यूपीए आघाडीकडे एकूण २३ टक्के मत आहेत. तर भाजपच्या नेतृत्वात असलेल्या एनडीएकडे ४८ टक्के मत आहेत. यामुळे संख्येनुसार भाजपकडे मोठी आघाडी असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा कऱण्यात आली आहे. यानंतर देशातील विरोधक आणि सत्ताधारी यांनी तयारी सुरु केली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विरोधी पक्षाकडून एनडीएविरोधात समान विरोधी उमेदवार उभे करण्यासाठी हालचाल सुरु झाली आहे. विरोक्षी पक्षनेत्यांची बैठक होणार असून यामध्ये उमेदवारीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. संपूर्ण विरोधक एकत्र आल्यास एनडीएचा पराभव करु शकतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य मतदान करतात. राज्यसभेच्या २४५ सदस्यांपैकी केवळ २३३ खासदार मतदान करु शकतात. तर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा विसर्जित करण्यात आली आहे. यामुळे तेथील राज्यसभेच्या ४ जागा रिक्त झाल्या आहेत. केवळ २२९ खासदारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. लोकसभेचे ५४५ सदस्यसुद्धा या निवडणुकीमध्ये भाग घेतील. ४ हजार ३३ आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करतील. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा सदस्यांच्या मतांचे मूल्य एकत्रित पाहिल्यास मतांचे एकूण १० लाख ८६ हजार ४३१ इतके आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी अर्ध्यापेक्षा अधिक मतांची गरज आहे. जिंकण्यासाठी ५ लाख ४३ हजार २१६ मतांची आवश्यकता आहे.

- Advertisement -

एनडीए-विरोधकांमध्ये चुरस

देशपातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वात असलेल्या यूपीए आघाडीकडे एकूण २३ टक्के मत आहेत. तर भाजपच्या नेतृत्वात असलेल्या एनडीएकडे ४८ टक्के मत आहेत. यामुळे संख्येनुसार भाजपकडे मोठी आघाडी असल्याचे दिसत आहे. भाजपला मात देण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र झाल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमधील समीकरण बदलत आहेत. जर सर्व विरोधी प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन पाठिंबा देत असतील तर एनडीएची कोंडी करणं शक्य होईल.

एनडीएकडे मतांची संख्या किती?

देशात सध्या भाजपकजे आघाडी आहे. भाजपच्या नेतृत्वामध्ये एनडीए असून जेडीयू, एआयएडीएमके, अपना दल, एलजीपी, एनपीपी, निषाद पार्टी, एनपीएफ, एमएनएफ, एआयएनआर, काँग्रेस सारख्या २० लहान पक्षांचा समावेश आहे. एनडीएकडे सध्या ५ लाख ३५ हजार मत आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी १३ हजार मतांची गरज आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षांकडे किती मते?

शरद पवारांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी आपण शर्यतीमध्ये नाही असे म्हटल आहे. यामुळे आता विरोधकांनी दुसरा उमेदवार शोधण्याची तयारी केली आहे. यामध्ये काही नेत्यांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांच्याशी संपर्क साधला आहे. 2017 मध्ये उपराष्ट्रपतीपदासाठी गांधी हे विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार होते. व्यंकय्या नायडू यांच्याकडून निवडणूक हरले आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.


हेही वाचा : अनिल परबांना ईडीचा समन्स, उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -