अनिल परबांना ईडीचा समन्स, उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश

शिवसेना (Shiv sena) नेते आणि परिहन मंत्री अनिल परब (Anil Parab)यांना ईडीने समन्स (ED) बजावले आहे. तसेच उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

Anil Parab absence from ED inquiry lawyer will ask ED for next date
अनिल परबांची ईडी चौकशीला गैरहजेरी, वकील ईडीकडे पुढची तारीख मागणार

शिवसेना (Shiv sena) नेते आणि परिहन मंत्री अनिल परब (Anil Parab)यांना ईडीने समन्स (ED) बजावले आहे. तसेच उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहे. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे उद्या अनिल परब हे ईडीसमोर चौकशीला हजर राहणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (anil parab ed summons to appear for interrogation tomorrow)

दापोलीत साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणाची ईडीकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात ईडीने सात ठिकाणी छापेमारी केली होती. तसेच ईडीकडून सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. यामध्ये अनेक कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली होती. याच प्रकरणी उद्या मुंबईतील कार्यालयात अनिल परबांनी चौकशीली हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

या रिसॉर्टसाठी केलेला खर्च बेनामी आहे असा संशय ईडीला आहे. या प्रकरणात ईडीने अनेक जबाबही नोंदवले आहेत. तसेच यात परब यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी मागील काही दिवासांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार परबांवर निशाणा साधला. जेलमध्ये जाणारे पुढचे मंत्री हे अनिल परब असतील असा दावाही त्यांच्याकडून अप्रत्यक्षपणे करण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सदानंद कदम यांचे पत्र उघड केलं होते. अनिल परब यांनी अनधिकृतपणे रिसॉर्ट बांधला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच या रिसॉर्टचे बांधकाम करताना सीआरझेडच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले होते. परंतु हा रिसॉर्ट आपल्या मालकीचा नसल्याचे अनिल परब यांनी म्हटलं. रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री ठाकरे सुरक्षा यंत्रणांवर भडकले