घरदेश-विदेशInd v/s China : भारत-चीन सीमेवर तणाव; दोन्ही देशांचे रणगाडे आमने सामने

Ind v/s China : भारत-चीन सीमेवर तणाव; दोन्ही देशांचे रणगाडे आमने सामने

Subscribe

भारत आणि चीनच्या सीमेवर पुन्हा हालचाली होऊ लागल्या आहे. ३० ऑगस्ट रोजी पँगॉग परिसरात झालेल्या चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर भारतीय लष्कराने त्यांना हुसकावून लावले होते. तेव्हापासूनच दोन्ही देशांमधील सीमेवरील तणाव पुन्हा वाढला होता. आज भारत आणि चीन यांनी आपापले रणगाणे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भारत – चीन सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले असून शस्त्र चालवण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. चीनचे रणगाडे आणि सैनिक पँगॉगच्या परिसरात काळा टॉप पर्वत क्षेत्राजवळ दबा धरून बसले आहेत. हा परिसर भारतीय सैनिकांनी ताब्यात घेतला आहे. या परिसरातील काळा टॉप हा महत्त्वाचा भाग आहे. युद्धासाठी ही जागा ओळखली जाते.

भारताच्या स्पेशल फोर्सने चकमा देत त्या काळा टॉप परिसराला आपल्या ताब्यात घेतले. भारतानेही आधीच चुशूल आणि स्पँगोर त्सो परिसरात आपले रणगाडे तैनात करून ठेवले आहेत. नुकतेच पँगॉगमध्ये झालेल्या चकमकीच्या परिसरातही भारताने रणगाडे तैनात केले आहेत. चीनच्या कारवायांना भारतीय सैनिक जशास तसे उत्तर देत आहेत. भारतीय सैनिकांनी रणगाडे आणि लष्करी दलाच्या सहाय्याने काळा टॉप परिसरात जाळं पसरवले आहे. तर दुसरीकडे चनीनेही मोठ्या प्रमाणात छोटे – मोठे रणगाडे आणून ठेवले आहेत. ते भारतीय रेंजच्या अगदी जवळ आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

मोलकरीण बाईकडून तीन वर्षाच्या चिमुरड्याला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -