घरदेश-विदेशमोलकरीण बाईकडून तीन वर्षाच्या चिमुरड्याला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

मोलकरीण बाईकडून तीन वर्षाच्या चिमुरड्याला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

मोलकरीण विरूद्ध एफआयआर नोंदवून तिला अटक करण्यात आले आहे.

कानपूरमधील कल्याणपूर येथे असणाऱ्या रतन आर्बिट अपार्टमेंटमधील फ्लॅटमधून धक्कादायक फोटो समोर आले आहेत. जिथे एक मोलकरीण बाई तीन वर्षांच्या मुलाला क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहे. ही बाब जेव्हा सगळ्यांसमोर आली तेव्हा कुटुंबीय थक्क झाल्याचे बघायला मिळाले.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील होत आहे.

अपार्टमेंटमधली आहे. येथे राहणारं एक जोडपे सरकारी नोकरी करतात. त्यामुळे ते त्यांच्या घऱात काम करणाऱ्या मोलकरीणीकडे मुलाला सोपवून ते दररोज नोकरीला जात असत. बर्‍याच दिवसांपासून त्यांचे मूल घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे दिसत होता. जेव्हा कुटुंबाला याची शंका आली तेव्हा त्यांनी सीसीटीव्हीमध्ये शोध घेतला आणि पाहिले तर त्यांना धक्काच बसला. ही मोलकरीण बाई त्यांच्या मुलाला लाथा, बुक्क्यांनी तसेच चप्पलेने बेदम मारहाण करताना दिसली.

- Advertisement -

मुलाचे वडील सौरभ यांच्या मते, मुलगा रोज रडायचा परंतु आम्हाला त्याचे म्हणणे योग्यरित्या समजू शकले नाही. एके दिवशी जेव्हा आम्हाला संशय आला तेव्हा आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिले त्यानंतर धक्काच बसला. जेव्हा मोलकरीणीने या कृत्याचे फुटेज तिला दाखवले. तेव्हा तिने हात व पाय जोडायला सुरुवात केली.

मुलगा अयांश हा मोलकरीण बाई रेनू सोबत फ्लॅटमध्ये राहत होता. रेणूने या महिलेवर लाथा-बुक्के आणि चप्पलने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. रोज या मुलाचे आई-वडिल घरी आल्यानंतर तो या मोलकरीण बाईकडे हात दाखवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचा असे देखील सांगितले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, कल्याणपुरातून हे प्रकरण समोर आल्यानंतर डीआयजी डॉ. प्रीतिंदर सिंह यांचे म्हणणे आहे की, एका अपार्टमेंटमध्ये रेणू नावाच्या कामवाल्या बाईने आपल्या मालकाच्या मुलाला बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आली आहे, आम्ही मोलकरीण विरूद्ध एफआयआर नोंदवून तिला अटक केली आहे.


बापरे! महिलेच्या तोंडातून निघाला ४ फूटाचा साप!
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -