घरदेश-विदेशमसाल्यातही महागाईची मिरची झोंबणार! लाल मिरचीच्या पिकावर किटकांचा हल्ला

मसाल्यातही महागाईची मिरची झोंबणार! लाल मिरचीच्या पिकावर किटकांचा हल्ला

Subscribe

तुमच्या स्वयंपाकघरातही आता महागाईचा परिणाम जाणवणार आहे. कारण प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात उपयुक्त असणारी लाल मिरची यंदा महागणार आहे. देशात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये होते. मात्र येथील मिरची पिकांवर यंदा हानिकारक किटकांनी हल्ला केला आहे. यामुळे सर्वाधिक मिरची उत्पादनाचे मोठे नुकसान झालेय. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र या परिस्थितीतीमुळे मसाल्यातही महागाईची मिरची झोंबणार असल्याचे म्हटले जातेय.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील मिरची पिकांवर हानिकारक कीटकांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभावी धोरण तयार करण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेल्या मसाले मंडळाने बुधवारी शास्त्रज्ञ आणि तज्ञांशी चर्चा केली. एका निवेदनात मंत्रालयाने म्हटले आहे की, आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील मिरचीच्या पिकांवरील कीटकांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मोटाकूटीला आला आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मसाला मंडळाने कृषी तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांशी चर्चा केली.

- Advertisement -

थ्रिप्स प्रजातीच्या कीटकांचा हल्ला

मिरची पिकावर थ्रिप्स प्रजातीच्या किडींनी हल्ला केला आहे. मात्र हे रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास दोन्ही राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. यासाठी आवश्यक उपाययोजना शोधण्यासाठी मिरची टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष आणि खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांशी चर्चा केली.

कर्नाटकलाही बसला फटका

आंध्र आणि तेलंगणा व्यतिरिक्त, कर्नाटक आणि इतर काही राज्यांमध्ये मिरची पिकावर किटकांनी हल्ल्या केल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अधिकृत निवेदनानुसार, या बैठकीत राव यांनी मिरचीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि स्वस्त दरात औषधी साहित्य उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -