घरताज्या घडामोडीMumbai Rains : विकेंडला मुंबईसह, राज्यात पाऊस, गारपिटीची शक्यता - IMD

Mumbai Rains : विकेंडला मुंबईसह, राज्यात पाऊस, गारपिटीची शक्यता – IMD

Subscribe

मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यात थंडीने पारा चांगलाच खाली गेला होता. पण हिवाळ्यातच पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अनुभव येणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई (IMD) ने पश्चिम महाराष्ट्रात येत्या विकेंडला म्हणजे शनिवारी आणि रविवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. अवकाळी पावसाच्या इशाऱ्याने शेतकरी हवालदील झाला आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राजस्थानच्या दक्षिण पश्चिमी भागात २२ जानेवारीला कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  (Mumbai and western Maharashtra weather update rain prediction weekend by IMD)

- Advertisement -

येत्या २२ जानेवारी आणि २३ जानेवारीला पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीची शक्यता आहे. यंदा डिसेंबर महिन्यातही राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली होती. अवकाळी पावसाचा फटका राज्यात अनेक भागात बसला. राज्यात गारपीट आणि पावसामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे. अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे तसेच फळबागांचेही मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी पिकाला या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर कोकणात पावसाच्या वातावरणामुळे आंब्याचे पिक घेणारा फळबागायतदार वर्गही चिंतेत आहे.राजस्थानच्या दक्षिण पश्चिमी भागात २२ जानेवारीला कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

दक्षिण कोकणासह गोवा तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात वर्तवण्यात आली आहे. राज्यात पावसाच्या वातावरणामुळे अनेक ठिकाणी एन लागवडीतील पिकालाही फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यातील अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. तर गारपिठीमुळे राज्यात स्ट्रॉबेरीच्या पिकाचे नुकसान पश्चिम महाराष्ट्रात झाल्याचे पहायला मिळाले होते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -