घरताज्या घडामोडीISRO ला मेड इन इंडिया ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स निर्मितीत यश

ISRO ला मेड इन इंडिया ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स निर्मितीत यश

Subscribe

अंतराळ विज्ञानात भारतातील सर्वोच्च संस्था असलेल्या ISRO ने देशाच्या संकट काळात एका अभिनव प्रयोगात यश मिळवले आहे. भारतीय बनावटीचे Oxygen concentrators तयार करण्यामध्ये ISRO ला यश मिळवले आहे. त्यामुळे या संस्थेने दाखवून दिले आहे की नुसत्या अंतराळ क्षेत्रासाठी ही संस्था काम करण्यापुरती मर्यादित नाही. तर संपुर्ण देशावर संकट आल्यावर या संस्थेने देशाच्या पाठीशी उभे राहण्याचे एक महत्वाचे योगदान दिले आहे. इसरोचे प्राविण्य नसलेल्या मेडिकल ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्सच्या निर्मितीतही त्यांनी यश मिळवले आहे. आता संपुर्ण देशाला हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देत असल्याचे इसरोमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे देशात भारतीय बनावटीचे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स येत्या दिवसात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील हे नक्की.

कोरोनाविरोधातील लढाईत देशभरात ऑक्सिजन एक्सप्रेसपासून ते नवनवीन ऑक्सिजन प्लॅंटच्या उभारणीसाठी अनेक राज्यात सरकारमार्फत कंबर कसण्यात आली. पण या सगळ्या कोरोनाविरोधातील लढाईत विक्रम साराभाई स्पेस सेंटरने मेडिकल ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर तयार केला आहे. ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या रूग्णांसाठी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हे उपकरण मदतीचे ठरणार आहे. कोरोनाच्या लढाईत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (ISRO) अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने या दरम्यानच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर तयार केला आहे. या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरला श्वास असे नाव देण्याक आले आहे.

- Advertisement -

श्वास या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरच्या माध्यमातून प्रेशर स्विंग एडसॉर्पशनच्या माध्यमातून नायट्रोजन गॅस वेगळा करत ऑक्सिजनची पातळी वाढण्यासाठी रूग्णांना मदत होणार आहे. एका मिनिटामध्ये १० लिटर ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सक्षम आहे. या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरच्या माध्यमातून एकाचवेळी दोन रूग्णांवर उपचार होणे शक्य आहे. ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर हा ६०० वॉट पॉवर क्षमतेचा आहे. तसेच २२० वोल्ट ५० हर्ट्झच्या वोल्टेजवर हे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर काम करतात. तसेच फ्लो रेट आणि लो प्युरिटी तसेच हाय लेवल प्युरिटी अशा पद्धतीचा अलार्मही ठेवण्यात आला आहे. या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचे वजन ४४ किलो इतके आहे. त्यामध्ये प्रेशर आणि फ्लो रेट डिस्प्लेचीही सुविधा आहे.

कसे तयार करण्यात आले ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स ?

वीएसएसीच्या म्हणण्यानुसार मेडिकल उपकरणे तयार करणे हे काम ISRO अंतर्गत येत नाही. कारण अशी उपकऱणे तयार करताना ह्युमन सायकोलॉजीचे सखोल ज्ञान हवे. श्वासाशी संबंधित उपकरणे तयार करणे ही गोष्ट डॉक्टरांच्या महत्वपूर्ण मार्गदर्शनाशिवाय शक्य नाही. म्हणूनच इसरोच्या टीमने या प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला. अभ्यासानंतरच या संपुर्ण थिअरीला समजून घेत त्यांनी हे उपकरण तयार करण्यात यश मिळवले आहे. ISRO ने या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरच्या माध्यमातून दाखवून दिले की फक्त रॉकेट सायन्समध्ये या विभागाचे विशेष नैपुण्य मर्यादित नाही. तर संपुर्ण देशावर आलेल्या संकटात ही संस्था देशाच्या पाठीशी उभी आहे, हेच या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्यासाठी अनेक कंपन्यांना आणि इंडस्ट्रीला आवाहन केले आहे. त्यामुळे देशात ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील असा ISRO ला विश्वास वाटतो.

- Advertisement -

 

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -