घरताज्या घडामोडीPetrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किंमती आज जैसे थे, जाणून घ्या आजचे...

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किंमती आज जैसे थे, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

काल पेट्रोलच्या किंमती ३१ पैशांनी तर डिझेलच्या किंमती २७ पैशांनी वाढल्या

मे महिन्यात सतत पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. मे महिन्यात तब्बल ५-६ वेळा पेट्रोलच्या किंमतीत वाढ करण्यात आली. मात्र आज बऱ्याच दिवसांनी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. काल पेट्रोलच्या किंमती ३१ पैशांनी वाढल्या होत्या. तर डिझेलच्या किंमती २७ पैशांनी वाढल्याचे पहायला मिळाले. विदेशी विनिमय दरासोबत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दरी रोजही बदलले जातात. तेल कंपन्या कच्च्या मालाच्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निश्चित करते. इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलच्या किंमतीत बदल करतात. आज मात्र पेट्रोल डिझेलच्या किंमती जैसे थे ठेवण्यात आल्या आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे पेट्रोल डिझेलच्या किंमती.

मुंबईत आज एक लिटर पेट्रोलसाठी ९९.१४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी ९०.७१ रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीतही आज पेट्रोलच्या किंमतीत वाढ झालेली नाही. दिल्लीत पेट्रोल ९२.८४ रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल ८३.५१ रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमती ९४.५४ रुपये आहेत. तर डिझेलच्या किंमती ८८.३४ रुपये आहेत. त्याचप्रमाणे कोलकतामध्येही पेट्रोलच्या किंमती ९२.९२ रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेल ८६.३५ रुपये प्रति लीटर आहेत.

- Advertisement -

इतर शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती

लखनऊ
पेट्रोल – ९०.५७ रुपये प्रति लीटर
डिझेल – ८३.८९ रुपये प्रति लीटर

चंदीगड
पेट्रोल – ८९.३१ रुपये प्रति लीटर
डिझेल – ८३.१७ रुपये प्रति लीटर

- Advertisement -

जयपूर
पेट्रोल – ९९.३० रुपये प्रति लीटर
डिझेल – ९२.१८ रुपये प्रति लीटर

आपल्या शहरातील दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमती आपण एका smsच्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकतो. यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP Dealer Code of Petrol Pump असे लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागले


हेही वाचा – Monsoon Update : मॉन्सून १ जूनला केरळमध्ये होणार दाखल; IMD चा अंदाज

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -