घरदेश-विदेशChandrayaan 3 : इस्रोचा सन्मान; चांद्रयान -3 मोहिमेसाठी 'एव्हिएशन वीक लॉरेट्स' पुरस्कार

Chandrayaan 3 : इस्रोचा सन्मान; चांद्रयान -3 मोहिमेसाठी ‘एव्हिएशन वीक लॉरेट्स’ पुरस्कार

Subscribe

नवी दिल्ली : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून अत्यंत ऐतिहासिक कामगिरी केली. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला होता. या कामगिरीबद्दल इस्रोवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. या चांद्रयान-3 मोहिमेचे जगभरात कौतुक झाले. आता इस्रोला मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने भारताचाही मान वाढला आहे. इस्रोच्या वतीने भारतीय डिप्लोमॅट श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

हेही वाचा – Delhi Traffic Release : दिल्ली सीमेवरील बॅरिकेड्स हटवले; 37 दिवसांनी वाहतूक कोंडीतून दिलासा

- Advertisement -

अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार इस्रोला मिळाला आहे. ‘चांद्रयान-3’ मोहिमेसाठी हा पुरस्कार इस्रोला देण्यात आला. चांद्रयान-2 मोहिमेच्या अपयशानंतर इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ यांनी त्यातूनही मार्ग काढत, अडचणींवर मात करत चांद्रयान-3 मोहीम यशस्वी केली. या माध्यमातून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा आणि रोव्हर चालवणारा भारत जगातील चौथा देश ठरला. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा हा पहिला देश ठरला, असं अधिकृत ऍवॉर्ड घोषणेत म्हटलं होतं.

“अवघ्या 75 मिलियन डॉलर बजेटमध्ये इस्रोने चंद्रावर लँडिंग केलं. तसंच चंद्रावर पाणी आणि सल्फर असल्याची माहिती देखील या मोहिमेतून मिळाली. ही खरंच मोठी कामगिरी आहे.”

- Advertisement -

काय आहे चांद्रयान मोहीम?

भारतीय आंतराळ संशोधन संस्था इस्रोने गेल्या महिन्यात जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी केली. इस्रोने १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटा येथून लाँच केलेलं चांद्रयान ३ हे अवकाशयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं. याद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला. त्यानंतर तब्बल १४ दिवस चांद्रयान ३ हे चंद्रावर संशोधन करत होतं. प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला चंद्रावरील वेगवेगळी माहिती, फोटो आणि व्हिडीओ पाठवत होते.

हेही वाचा – Ajit Pawar : ज्यावेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील तेव्हा मी…; अजितदादांचे मिश्किल भाष्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -