घरदेश-विदेशIT Raid : NSE च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर आयकर...

IT Raid : NSE च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

Subscribe

नॅशनल स्टॉक एक्सचेंडच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या मुंबईतील एका घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सेबीतच्या एका आदेशामुळे अलीकडेच रामकृष्ण चर्चेचा विषय बनल्या होत्या. सेबीने त्या आदेशात म्हटले होते की, त्यांनी हिमालयातील एका योगी बाबांच्या सांगण्यावरून एक्सचेंज समुहाचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून सल्लागार आनंद सुब्रमण्यम यांची निवड केली.

आयकर विभागाने या छापेमारीसंदर्भात सांगितले की, करचुकवेगिरी, आर्थिक अनियमिततेच्या आरोपींच्या चौकशीसाठी ही छापेमारी केली आहे. रामकृष्ण यांनी एनएसईच्या आर्थिक आणि व्यावसायिक योजनांसंदर्भातील काही गोपनीय माहिती हिमालयातील एका योगींना सांगितली होती, तसेच एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकनाबाबतही त्यांनी योगींचा सल्ला घेतला होता, असं सेबीच्या आदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

यामुळे सेबीने रामकृष्ण आणि इतर काही आरोपींविरोधात दंड ठोठावला आहे. यात सेबीने रामकृष्ण यांना 3 कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे, सुब्रमण्यन यांच्या नियुक्तीमध्ये संरक्षण कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्याच आल्याचे सेबीने सांगितले आहे. आनंद सुब्रमण्यन यांची समुहाच्या कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सल्लागार पदी नियुक्ती करत संरक्षण नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हणत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

चित्रा रामकृष्णा या एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 पर्यंत एनएससीच्या एमडी आणि सीईओ होत्या. रामकृष्ण या त्या हिमालयीन योगी बाबांना शिरोमणी असं म्हणायच्या. त्यांच्या मते ते एक आध्यात्मिक शक्ती असून गेल्या वीस वर्षांपासून त्या त्यांच्याकडे वैयक्तिक आणि व्यावसायिक विषयांवर मार्गदर्शन घ्यायच्या. रामकृष्ण यांच्या मते, हिमालयीन योगी बाबा अशी एक अज्ञात व्यक्ती किंवा आध्यात्मिक शक्ती होती. जी आपल्या इच्छेनुसार कुठेही प्रकट होऊ शकते.

- Advertisement -

या घटनेनंतर आता चित्रा रामकृष्ण आणि सुब्रहमण्यम यांना तीन वर्षांसाठी बाजारातील सर्व कामाकाजावर बंदी घालण्यात आली आहे. यासह सेबीने NSE ला रामकृष्ण यांच्याकडून 1.54 कोटी रुपयांचा स्थगित बोनस आणि अतिरिक्त रजेच्या बदल्यात दिलेले 2.83 कोटी रुपये जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -