घरदेश-विदेश'जॅक मा' चा अलिबाबाला रामराम

‘जॅक मा’ चा अलिबाबाला रामराम

Subscribe

जॅम मा नं अलिबाबाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या पुढे जॅक मा शिक्षक म्हणून काम करणार आहे.

जॅक मा म्हटलं आपल्या डोळ्यासमोर उभी राहते अलिबाबा कंपनी. पण, याच जॅक मा नं आता अलिबाबा कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की जॅक मा आता करणार तरी काय? तर थोडं थांबा. कारण जॅम मा आता शिक्षक होणार आहे. १० सप्टेंबर अर्थात आजच जॅक मा नं आपण आलिबाबाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. पण जॅक मा त्यानंतर देखील कंपनीच्या मंडळावर २०२० पर्यंत राहणार आहे. जॅक मा हा आयुष्यभर कंपनीचा भागीदार असणार आहे. कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जॅक मा नं शेअरहोल्डर, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना एक पत्र देखील लिहिले आहे.

काय आहे ‘जॅक मा’च्या पत्रामध्ये?

अलिबाबाच्या अध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे. बोर्ड ऑफ डिरेक्टरीनं माझा राजीनामा मंजूर केला आहे. पण पुढील १० सप्टेंबर २०१९ पर्यंत मी अध्यक्षपदी कायम असेल. कंपनीच्या भल्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर २०२० पर्यंत मी बोर्ड ऑफ डिरेक्टरीवर कायम असेल. मागील १० वर्षे मी कंपनीला शक्य ते देण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. कारण, तुम्ही दिलेले प्रेम, पाठिंबा आणि मेहनत यामुळेच आपण २० वर्षे यशस्वी वाटचाल केली. आज जगात अलिबाबचे नाव झाले आहे. ती विश्वासार्हता आपण कायम राखली पाहिजे. जॅक मा नंतर कंपनी कशा प्रकारे वाटचाल करेल असा सवाल वारंवार विचारला गेला. पण, आपण जी व्यवस्था उभी केली आहे. त्यावरून ही गोष्ट खूप कठिण आहे असं मला काही वाटत नाही. प्रत्येक संकटाचा आपण अत्यंत खंबीरपणे सामना केला आहे. जगातील तरूण आणि महिला खूप काही नाविन्यपूर्ण गोष्टी करत आहेत. आपण सर्वजण एकाच ध्येयानं पछाडले होतो ते म्हणजे कंपनीचा विकास. २०१३ मध्येच मी माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांतर पाच वर्षे कंपनीनं अत्यंत यशस्वीपणे घोडदौड केली. जगातील सर्वोत्तम देण्याचा आपण प्रयत्न केला. अद्याप देखील अनेक स्वप्नांचा पाठलाग मी करतच आहे. मला शिक्षण क्षेत्रामध्ये परत यायचं होतं. जग खूप मोठं आहे. मी खूप तरूण आहे. त्यामुळे मला नवीन नवीन गोष्टी आत्मसाथ करायला आणि शिकायला तयार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -