घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता, एजन्सीज् हाय अलर्टवर

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता, एजन्सीज् हाय अलर्टवर

Subscribe

तालिबान्यांनी अफगाणिस्तानची सत्ता बळावल्यानंतर आता भारताच्या सीमेपलीकडे दहशतवाद्यांत्या गुप्त हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. देशातील गुप्तचर यंत्रणांनी गेल्या १५ दिवसांत १० वेळा दहशतवादी हल्ल्याचा हायअलर्ट जारी केला. या सर्व अलर्टमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व घटनांकडे गुप्तचर संस्था एक मोठा धोका म्हणून बघत आहेत. गुप्तचर संस्थांकडून दहशतवाद्यांच्या हालचाली पाहता पाक दहशतवादी भारतात सतत घुसखोरी करत एक मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अनेक काश्मीर तरुणांनाही भारताविरोधातील दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी भडकवले जात आहे. तर काही तरुणांचे अपहरण झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, पाकिस्तानातील विविध गुप्त तळांमधून जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोय्यबा, हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांकडून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करत भारतात मोठा आयईडी (IED) स्फोट घडवून आणण्याची तयारी सुरु आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली जात आहे.

- Advertisement -

गुप्त संस्थांची माहिती यासाठी महत्त्वाची आहे कारण, अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवण्यानंतर येथील तुरुंगामधून जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर ए-तोय्यबा संघटनेच्या अनेक दहशतवाद्याची मुक्तता करण्यात आली. यानंतर त्यांनी पाकिस्तान गाठत मोठा आनंदोत्सव साजरा केला. याचे काही फोटो सध्या सोशल मीडिय़ावर व्हायरल होत आहेत. अशापरिस्थितीत काश्मीर खोऱ्यात आता दहशतवाद्यांच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. यामुळे सध्या, सर्व राज्ये आणि केंद्राच्या दहशतवाद विरोधी युनिट्सला हाय अलर्ट करण्यात आले आहे.


Railway Recruitment 2021: १२ वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, महिना ९३ हजार पगार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -