घरदेश-विदेशJammu Kashmir: अनंतनागमध्ये CRPF बंकरवर दहशतवादी हल्ला; हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू

Jammu Kashmir: अनंतनागमध्ये CRPF बंकरवर दहशतवादी हल्ला; हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू

Subscribe

या खोऱ्यातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान सतत कार्यरत असतात.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नापाक कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीत. यात अनंतनागमध्ये पुन्हा एकदा सीआरपीएफ जवानांवर हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सीआरपीआरच्या बंकरवर गोळीबार केला होता. मात्र, या हल्ल्यात कोणालाही दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. बुधवारी केपी रोडवरील सीआरपीएफ बंकरवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबाराचा आवाज ऐकून लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान सुरक्षा दलांनी तत्काळ परिसराला घेराव घालत शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी केपी रोडवरील एफएम गली येथील सीआरपीएफ बंकरवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

या खोऱ्यातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान सतत कार्यरत असतात. सुरक्षा दलांच्या या कारवायांमुळेच दहशतवादी हैराण झाले असून अशाप्रकारचे हल्ले करत आहेत. अलीकडेच, सोपोर आणि बांदीपोरा भागात लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या सहा दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले होते. या सहा दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. दरम्यान रविवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले होते.

- Advertisement -

अधिकार्‍यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी 7.20 वाजता दहशतवाद्यांनी सराफ कादल भागात तैनात पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस हवालदार मेहराज अहमद आणि स्थानिक रहिवासी सरताज अहमद जखमी झाले. त्यांना जवळच्या एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

त्याचवेळी, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानसाठी काम करणारे लोकं काश्मिरी तरुणांना दहशतवादात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावाही अलीकडेच करण्यात आला होता. दरम्यान काश्मिरी तरुणांना हिंसेचा मार्ग सोडायचा असेल, तरी भाड्याने काम करणारे घटक त्याना मारू शकतात. अशई माहिती एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांने दिली आहे.


इंडिगोच्या दोन विमानांची ३ हजार फूट उंचावरील टक्कर टळली, ४०० पेक्षा जास्त प्रवाशी बचावले


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -