Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश संपूर्ण प्रौढ लोकांना Corona Vaccine देणार 'हे' देशातील पहिले गाव; जाणून घ्या...

संपूर्ण प्रौढ लोकांना Corona Vaccine देणार ‘हे’ देशातील पहिले गाव; जाणून घ्या या गावाबद्दल…

Related Story

- Advertisement -

देशात एकीकडे कोरोनाचा कहर अद्याप संपलेला नाही तर दुसरीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम देखील चांगलीच राबिवली जात आहे. असच एक गाव आहे जेथे संपूर्ण प्रौढांचे लसीकरण करण्यात आले आहे आणि हे गाव देशातील पहिलं गाव ठरल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील वेयान गाव हे देशातील पहिले गाव बनले आहे जेथे सर्व प्रौढ लोकांना कोविड -१९ लसीचा डोस देण्यात आला असल्याची माहिती मंगळवारी तेथील अधिकाऱ्यांनी दिली. वेयान या गावात एकूण ३६२ प्रौढ व्यक्ती राहतात, तसेच प्रत्येकाला लस देण्याचे श्रेय तेथील आरोग्य कर्मचार्‍यांना जाते ज्यांच्या परिश्रमामुळे हे गाव देशभर चर्चेचे केंद्र बनले आहे.

- Advertisement -

आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “वेयान गाव बांदीपोरा जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या २८ कि.मी. अंतरावर आहे, परंतु तेथे पोहोचण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना साधारण १८ किमी चालत जावे लागले.” या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, या गावातल्या सर्व प्रौढांना लसीकरण करण्याचे काम कठीण होते. कारण या गावात काही भटक्या जमातीची माणसे राहतात जे प्राणी चरण्यासाठी खूप उंच ठिकाणी डोंगरावर जातात. त्यांची लसीकरणासाठी वाट पाहणे हेदेखील आव्हानात्मक काम होते.

लसीकरण मोहिमेदरम्यान आरोग्य कर्मचार्‍यांना भेडसावणाऱ्या अडचणींबद्दल सांगताना बांदीपोरा जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बशीर अहमद खान म्हणाले, गावात इंटरनेट सुविधा नसल्याने तेथील रहिवाशांना शहरातील रहिवाशांप्रमाणे लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे शक्य ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नव्हते.

- Advertisement -

गावात कोरोना लसीकरण अभियान ‘जम्मू-काश्मीर मॉडेल’ अंतर्गत राबविण्यात आले असून, संपूर्ण लोकसंख्येचे जलद गतीने लसीकरण करण्याचे धोरण आहे. कोविड लसीबाबत जम्मू-काश्मीरमधील लोकांमध्ये सुरुवातीच्या संकोच असूनही, साधारण ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटातील ७० टक्के लोकांना लस डोस देण्यात आला आहे, जो राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट आहे. जम्मू-काश्मीर सरकारचे माध्यम सल्लागार यतीश यादव यांनी वेयान गावच्या या कामगिरीबद्दल सांगितले की, केंद्रशासित प्रदेशात लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे.


World Brain Tumour Day: आज जगभरात साजरा केला जातो वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे, काय आहेत ब्रेन ट्यूमरची लक्षणे?

- Advertisement -