Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन ‘हसीन दिलरुबा'सिनेमाचा टीजर रिलीज,तापसी पन्नू दिसणार बोल्ड अंदाजात

‘हसीन दिलरुबा’सिनेमाचा टीजर रिलीज,तापसी पन्नू दिसणार बोल्ड अंदाजात

सीन दिलरुबा' सिनेमा मिस्ट्री थ्रिलरवर आधारित आहे. तिघा कलाकारांनी सिनेमाचा टीजर शेअर केला आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या कलेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं आहे. तसेच आपल्या हजर जवाबीपणामुळे देखील ती ओळखली जाते. नुकतच तापसीच्या आगामी ‘हसीन दिलरुबा’ (Haseen Dilruba) सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. आणि सिनेमा कधी रिलीज होणार आहे हे देखील टीजरमध्ये सांगण्यात आले आहे. तापसीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या आगामी सिनेमाचा टीजर शेअर केला आहे. या सिनेमात विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) आणि हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. देशावर अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे अशा स्थितीत लोकांची पाऊले थेटरकडे वळवणे कठीण आहे. यामुळे सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.

काय आहे टीजर मध्ये –

‘हसीन दिलरुबा’ सिनेमाच्या टीजरमध्ये तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सी यांचा विवाह झाला असल्याचे दिसत आहे. आणि याचदरम्यान तापसी पन्नूचं नातं हर्षवर्धन राणे सोबत जोडले जाते.  यानंतर कथेत लव्ह ट्रायंगल झालेला दाखवण्यात येत आहे. अशातच तिघांमधील एकाचा खून होतो. ‘हसीन दिलरुबा’ सिनेमा मिस्ट्री थ्रिलरवर आधारित आहे. तिघा कलाकारांनी सिनेमाचा टीजर शेअर करत त्याला “प्यार के तीन रंग, खून के छींटों के संग….” असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी तसेच अनेक कलाकारांनी टीजरला चांगलीच पसंती दर्शवली आहे. 2 जुलै 2021 मध्ये सिनेमा रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

चित्रपटाचा टीजर पाहा 

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

- Advertisement -


हे हि वाचा – ‘सीतेच्या’भूमिकेसाठी करीनाने मागितले तब्बल12कोटी रुपये!निर्मात्याला फुटला घाम

- Advertisement -