घरदेश-विदेशमणिपूरमधील घटनेत पोलिसांची सपशेल डोळेझाक..., जावेद अख्तर संतापले

मणिपूरमधील घटनेत पोलिसांची सपशेल डोळेझाक…, जावेद अख्तर संतापले

Subscribe

मणिपूरमध्ये दोन महिलांसोबत घडलेल्या घटनेचा अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी देखील याबाबतचे ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.

मणिपूर : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या घटना घडत असून यामुळे मणिपूर जळत आहे. मणिपूरमधील या घटनेचे पडसाद देशातील अनेक भागांत उमटताना पाहायला मिळत आहे. महिलांसोबत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण देशाला शरमेने मान खाली घालायला लागत असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी देखील याबाबतचे ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. (Javed Akhtar got angry due to Manipur incident)

हेही वाचा – Manipur : अडीच महिन्यांत मणिपूर बनले गुन्हेगारीचे केंद्र; 70 हत्या, 5 बलात्कार, तब्बल 6000 एफआयआर

- Advertisement -

“मणिपूरची घटना 4 मे रोजी घडली आहे. दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. याकडे पोलीस प्रशासनाने सपशेल डोळेझाक केली. 19 जुलैला व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा चार संशयितांना 20 जुलै रोजी अटक करण्यात आली. तुम्ही कुणाला मूर्ख बनवत आहात?” असा प्रश्न जावेद अख्तर यांनी ट्वीटच्या माध्यमातून उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे. त्यांचे हे ट्वीट अनेक नेटकऱ्यांनी रिट्वीट केले आहे. जावेद अख्तर हे नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर ट्वीटच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करत असतात. सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दरम्यान विधानसभेमध्ये आमदार अबू आझमी यांनी आम्ही अल्ला सोडून कोणासमोर झुकत नाही, त्यामुळे मी ‘वंदे मातरम’ बोलणार नाही, असे वक्तव्य केले. याच वक्तव्याला उद्देशून जावेद अख्तर यांनी ‘वंदे मातरम’ असे ट्वीट केले.

- Advertisement -

काय आहे घटना?

मणिपूर मधील दोन महिलांसोबत सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली गेली आहे. या व्हिडिओ दोन महिलांना विवस्र करुन त्यांची धिंड काढली गेली. या व्हायरल व्हिडिओवर राजकीय नेते, कलाकार आणि देशभरातील लोकांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी मणिपूर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत एका व्यक्तीला अटक केली आहे. (Manipur Violence)

आरोपीची ओळख खुरिएम हीरो दासच्या रुपात झाली आहे. व्हिडिओत पुरुषांच्या एका ग्रुपने दुसऱ्या समुदायातील दोन महिलांना निवस्र करुन त्यांची धिंड काढली. तर इंडिजीनियस ट्राइबल लीडर्स फोरमच्या गुरुवारी ठरलेल्या प्रस्तावित परेडआधी हा व्हिडिओ समोर आला आहे. तर सरकारने ट्विटरसह अन्य सोशल मीडियातून मणिपूरातील हिंसाचाराचा हा व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -