घरदेश-विदेशJharkhand Floor Test : चंपई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री; बहुमत चाचणी जिंकली

Jharkhand Floor Test : चंपई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री; बहुमत चाचणी जिंकली

Subscribe

झारखंडेचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी 2 फेब्रुवारीला चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

रांची : चंपई सोरेन यांनी बहुमत चाचणी जिंकली आहे. यानंतर चंपई सोरेन यांचे सरकार अबाधित राहिले आहे. बहुमत चाचणीत चंपई सोरेन यांच्या बाजूने 47 मते पडली, तर विरोधात 29 मते मिळाली. झारखंड मुक्ती मोर्चाचे 40 आमदार फुटू नये म्हणून त्यांना हैदराबाद येथे ठेवले होते. पण बहुमत चाचणीसाठी रविवारी (4 फेब्रुवारी) सर्व आमदार हैदराबादहून रांचीला परतले.

झारखंडेचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी 2 फेब्रुवारीला चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. आज चंपई सोरेन सरकारची बहुमत चाचणी झाली होती आणि यात त्यांना यश मिळाले. यापूर्वी जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांना ईडीने केले आहे. 31 जानेवारी रोजी हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

- Advertisement -

हेही वाचा – Champai Soren Government Floor Test : झारखंडच्या राजकारणासाठी आजचा दिवस मोठा; चंपाई सोरेन सरकारची अग्निपरीक्षा

सत्ताधाऱ्यांकडे एवढे आहे संख्याबळ

झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 जागा आहे. झारखंड मुक्ती मोर्चा 29 , काँग्रेस 17, आरजेडी 1 आणि सीपीआय 1 असे एकूण 48 आमदारांचे पाठबळ आहे. झारखंडमध्ये बहुमतासाठी 41 एवढा संख्याबळाची गरज आहे. तसेच एनडीएकडे 33 आमदारांचे संख्याबळ आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Jharkhand CM : चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री; बहुमत सिद्ध करण्यासाठी मागितला 10 दिवसांचा वेळ

कोण आहे चंपई सोरेन?

चंपई सोरेन हे सरायकेला मतदारसंघाचे आमदार असून सध्या ते परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री होते. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्षही आहेत. चंपई सोरेन हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. पण हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर चंपई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -